Home पुणे मा. अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना पीएच.डी पदवी – मानव विकासावर संशोधनात मोठी कामगिरी!

मा. अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना पीएच.डी पदवी – मानव विकासावर संशोधनात मोठी कामगिरी!

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

पुणे (प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी)पदवीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संतोष नानासाहेब ढोरे यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांनी ‘पुणे व नाशिक जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकाचा तुलनात्मक आर्थिक अभ्यास’ या विषयावर अध्ययनाचे काम पूर्ण केले. नुकतीच त्यांना विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली.

त्यांना डॉ.शिवाजीराव ढगे व डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले.त्यांचे आमदार शंकरशेठ जगताप , प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर ,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे ,अधिष्ठाता डॉ.विजय खरे, उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे यांनी अभिनंदन केले.

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment