O”शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या लढ्याला यश – चऱ्होली TP Scheme रद्द करत महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय”
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या मौजे चऱ्होलीची TP Scheme अखेर रद्द करण्यात आली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, स्थानिक भूमिपुत्रांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे महापालिका प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला.
महानगरपालिका प्रशासनाने आज अधिकृतरित्या घोषणा करत चऱ्होली TP Scheme रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा विजय झाला आहे.
हे हि वाचावे
आषाढीवारीची जय्यत तयारी! पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वारकऱ्यांचे स्वागत होणार
🌆 शहरीकरणाच्या नावाखाली अन्याय?
महानगरपालिका क्षेत्रात सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. याच पार्श्वभूमीवर, मौजे चिखली आणि चऱ्होलीसह अनेक गावांमध्ये TP Scheme लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा सहभाग न घेता ही योजना राबवली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
या योजनांमुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत होते. याआधीही MIDC, नवनगर विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका हद्दवाढीच्या वेळेस अनेक जमिनी आरक्षणाखाली गेल्याची पार्श्वभूमी होती.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाइट
💥 आमदार महेश लांडगे यांचा निर्णायक विरोध
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत तीन बैठकांमधून तीव्र विरोध मांडला. त्यांनी विचारले की, “शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना, TP Scheme चा आग्रह का?”
या पाठपुराव्याला आधार देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतही मुद्दा नेण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ, माजी महापौर नितीन काळजे, आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनी देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
🛑 ‘चऱ्होली बंद’चा दबाव आणि प्रशासनाचा नमतेपणा
30 मे रोजी ‘चऱ्होली बंद’ ची हाक दिली गेली. त्यानंतर ग्रामस्थांची एकत्रित बैठक झाली आणि आंदोलन तीव्र झालं. याचा परिणाम म्हणून महापालिका प्रशासनाने मौजे चऱ्होलीच्या TP Scheme वर स्थगितीची घोषणा केली.
आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले, “भूमिपुत्रांच्या भावना आणि आमदार लांडगे यांच्या विरोधाचा सन्मान करून आम्ही ही प्रक्रिया थांबवत आहोत. लवकरच ही Scheme रद्द करण्याचे प्रस्ताव सादर केले जातील.”
📣आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया > "पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्र हा माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू आहे. चिखली आणि चऱ्होली – दोन्ही गावांच्या TP योजना रद्द होणे, हे भूमिपुत्रांच्या लढ्याचं फलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात पाठिंबा दिला. शास्तीकर माफी, प्राधिकरण परतावा, बफर झोन रद्दीकरण यांसारखे निर्णयही सरकारने घेतले. मी पुढेही भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढा देत राहीन. – आमदार महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड