“क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण – पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक क्षण”
पिंपरी, १७ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चापेकर स्मारक समितीच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेले स्मारक आता राष्ट्राला समर्पित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ एप्रिल रोजी चिंचवडमध्ये या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. याचबरोबर प्रस्तावित राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामालाही शुभारंभ होणार आहे.
‘क्रांतीवीर चापेकर स्मारक’ म्हणजे देशभक्तीचा जिवंत साक्षात्कार
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ९.४५ वाजता आयोजित कार्यक्रमात देशातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, यांच्यासह विविध मंत्री, खासदार आणि आमदार यांची उपस्थिती राहणार आहे.
१३.५२ कोटींच्या निधीतून उभारले गेलेले आधुनिक ‘क्रांतीवीर चापेकर स्मारक’
क्रांतीवीर चापेकर स्मारकासाठी १३ कोटी ५२ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. या स्मारकामध्ये ३०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला पारंपारिक लाकडी वाडा उभारण्यात आला आहे. यामध्ये चापेकर बंधूंच्या कौटुंबिक जीवनाची झलक आणि त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दर्शविणारे एआर/व्हीआर आधारित सजीव अनुभव देणारे चित्रण समाविष्ट करण्यात आले आहे.
हे हि वाचावे
“Apple iPhone 16e: आता 60,000 रुपये कमी किंमतीत, स्मार्टफोन गेम बदलणार!”
‘क्रांतीवीर चापेकर स्मारक’ युवापिढीसाठी होणार प्रेरणास्थान
१८९७ साली प्लेगच्या काळात ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध करून देशासाठी बलिदान देणाऱ्या चापेकर बंधूंचा हा इतिहास नव्या पिढीला समजावा, यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक केवळ इतिहास मांडत नाही, तर देशभक्तीची प्रेरणा देणारे जीवनदायी स्थान ठरते.
क्रांतिवीर चाफेकर बंधु यांच्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
‘क्रांतीवीर चापेकर स्मारक’ – पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वारशात एक नविन भर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात हे स्मारक एक मोलाचा अध्याय ठरणार आहे. स्मारक परिसरात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या अनेक उपक्रम राबवले जाणार असून, येणाऱ्या काळात हे स्थळ राष्ट्रीय पातळीवर आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.