संपूर्ण महाराष्ट्रात गरम आणि दमट हवामान टिकून राहणार; हवामान खात्याचा इशारा
“पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेची लाट: नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काय उपाय करावेत?”
पिंपरी, २५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत तापमानात मोठी वाढ होणार असून पिंपरी चिंचवड शहरालाही या लाटेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, “दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. उन्हात निघताना डोकं झाकून ठेवा, पुरेसे पाणी प्या आणि थेट सूर्यप्रकाश टाळा.” प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक ठिकाणी आवश्यक ती सुविधा व पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
हे हि वाचावे
पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार घर – अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या”
हवामान खात्याचा अंदाज
२६ एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता असली तरी त्यापर्यंत तीव्र तापमान, गरम व दमट हवामान, आणि उष्माघात यांचा धोका राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी आणि अगदी गरजेचे असल्यासच बाहेर पडावे.
जास्त धोका असलेली लोकसंख्या
ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील)
लहान मुले (१ ते ५ वर्ष व १ वर्षाखालील)
गरोदर महिला
हृदयविकार, मधुमेह आणि दारूचे व्यसन असलेले
ऊनात काम करणारे मजूर व कामगार
उष्माघात होण्याची कारणे
दीर्घकाळ उन्हात काम करणे
बॉयलर, बेकरी, कारखाने, काच फॅक्टरीसारख्या गरम ठिकाणी काम करणे
घट्ट व गडद रंगाचे कपडे वापरणे
हवामान खात्याची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
उष्माघाताची लक्षणे
थकवा, ताप, त्वचा कोरडी पडणे
चक्कर, डोकेदुखी, भूक मंदावणे
मानसिक अस्वस्थता, पोटऱ्यांत गोळे, बेशुद्ध होणे
प्रतिबंधात्मक उपाय
सकाळी किंवा संध्याकाळी काम करणे
हलके, फिकट रंगाचे सुती कपडे वापरणे
भरपूर पाणी, सरबत, लिंबूपाणी सेवन करणे
डोक्यावर टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करणे
उन्हात काम थांबवून सावलीत विश्रांती घ्या
लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
“हे टाळा” – आवश्यक सूचना
लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नका
दुपारी १२.०० ते ३.३० दरम्यान उन्हात नका जाऊ
गडद व जाड कपडे, कृत्रिम कपड्यांचा वापर टाळा
या वेळेत (१२ ते ३:३०) शारीरिक श्रम टाळा
उपचार पद्धती
रुग्णाला हवेशीर किंवा वातानुकूलित खोलीत ठेवा
थंड पाण्याने अंघोळ घालावी, पांघरे द्यावीत
कपाळावर थंड पट्ट्या, आईसपॅक ठेवावेत
आवश्यक असल्यास सलाईन उपचार घ्यावा
शेखर सिंह (आयुक्त, PCMC) "महत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नका. वृद्ध, मुले, आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी सहकार्य करावे." डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी, PCMC) "शाळा, वर्कशॉप्स, व सार्वजनिक कार्यक्रमांबाबत सावधगिरी आवश्यक आहे. उष्माघाताचे लक्षणे दिसल्यास जवळच्या पालिका रुग्णालयात त्वरित उपचार घ्या.