पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन संकेतस्थळ”
आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या डिजिटल संकेतस्थळाचे लोकार्पण
कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲक्सेसिबिलिटी आणि सुरक्षेच्या आधारे आधुनिक संकेतस्थळाची लोकाभिमुख सुरुवात
पिंपरी, २१ एप्रिल २०२५:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) सतत डिजिटल युगाशी सुसंगत होत नागरिकांना सक्षम, पारदर्शक व जलद सेवा पुरवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन संकेतस्थळ” लोकार्पण महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे संकेतस्थळ आता सर्व नागरिकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे.
स्मार्ट शहरासाठी स्मार्ट संकेतस्थळ
हे नव्याने विकसित संकेतस्थळ नागरिकांसाठी अधिक उपयोगी, संवादात्मक आणि सुरक्षित बनवण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून करसंकलन, विविध देयके, तक्रारी नोंदणी व अन्य महत्त्वाच्या सेवा एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सुरक्षा मानके आणि ॲक्सेसिबिलिटीचे आधुनिक घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवीन संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन संकेतस्थळ” वैशिष्ट्ये –
• ॲक्सेसिबल डिझाईन:
डब्ल्यूसीएजी (WCAG) AA मानकांचे पालन करत, हे संकेतस्थळ दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ बनवले गेले आहे.
• AI आधारित माहिती शोध प्रणाली:
चॅट जीपीटीच्या सहाय्याने नागरिकांना हव्या असलेल्या माहितीचा वेगवान आणि अचूक शोध घेता येणार आहे.
• सुरक्षा सुधारणा:
हॅकथॉन २०२५ अंतर्गत देशभरातील १७५ तज्ज्ञांनी दिलेल्या अभिप्रायावर आधारित सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच एथिकल हॅकर्समार्फत सखोल सुरक्षा चाचणीही पार पडली आहे.
• GIGW मानकांचे पालन:
केंद्र शासनाच्या GIGW मार्गदर्शक तत्वांनुसार संकेतस्थळाची रचना करण्यात आली असून यामुळे प्रशासनाचा दर्जाही अधिक उंचावला आहे.
• संपूर्ण सेवा एका ठिकाणी:
महापालिकेच्या विविध सेवा – कर भरणा, तक्रारी, परवाने यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून, यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.
हे हि वाचावे
प्रशासनाचे दृष्टिकोन
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले,
“हे संकेतस्थळ नागरिक केंद्रित तत्त्वावर आधारित आहे. जलद, पारदर्शक व सुरक्षित सेवा देण्यासाठी यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲक्सेसिबिलिटी व सुरक्षा यांचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन संकेतस्थळ” हे भविष्यातील डिजिटल गरजांना प्रतिसाद देणारे एक आदर्श मॉडेल ठरेल.”
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी नमूद केले,
“साइटच्या विकासात नागरिकांचा अनुभव केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानामुळे संवाद अधिक नैसर्गिक झाला असून, दिव्यांगांसाठी सुलभ ॲक्सेसिबिलिटी फिचर्स व जागतिक सुरक्षानियमांचे पालन हे या संकेतस्थळाचे” मुख्य वैशिष्ट्य आहे.” त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन संकेतस्थळ” हे आधुनिक आणि जलद झाले आहे
मार्गदर्शन आणि सहकार्य
या संकेतस्थळ विकासात श्रीमती उज्वला गोडसे यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. संकेतस्थळाच्या विकास प्रक्रियेत वापरकर्त्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून तांत्रिक सल्लागारांच्या मदतीने अंतिम स्वरूप देण्यात आले.

