“प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवड”
PMAY लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: किवळे प्रकल्पात स्वप्नातील घर फक्त ₹13 लाखांत
सदनिकेची किंमत आणि निकष
आवश्यक कागदपत्रांची यादी
पिंपरी, २४ एप्रिल २०२५: प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवड अंतर्गत रावेत प्रकल्पातील निवड व प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या गृहप्रकल्पातील ७५५ सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी लाभार्थ्यांना ०९ मे २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे.
हे हि वाचावे
पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे संकेतस्थळ AIसोबत लॉन्च
सदनिकेची माहिती:
स्थान: किवळे, पिंपरी चिंचवड
संख्या: ७५५ सदनिका
किंमत: ₹13,00,718/-
प्राधान्य: प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम संधी
या कागदपत्रांची आवश्यकता:
आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)
पॅन कार्ड (अर्जदार व सह-अर्जदार)
जातीचा दाखला
मतदान ओळखपत्र
बँक पासबुक
चालू महिन्याचे वीज बिल
उत्पन्नाचा दाखला (2024-25) / ITR / फॉर्म १६
अधिवास प्रमाणपत्र
भाडे करारनामा/संमतीपत्र
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
प्रधानमंत्री आवास योजना अधिकृत पोर्टल
कुठे व केव्हा सादर करायचे?
ठिकाण: झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चिंचवडगाव
वेळ: सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.००
सावधगिरी: एजंटांपासून सावध राहा!
> "किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनास बळी पडू नये. संमतीपत्राचा अधिकृत नमुना विभागाकडूनच घ्या व अर्ज करा." — अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन विभाग