• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
पिंपरी चिंचवडकलाक्रीडामहाराष्ट्र

‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव

by gauravsalunkhe00@gmail.com September 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
36

माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास
– श्री भैरवनाथ दहीहंडीत चाहत्यांचा तुफान जल्लोष

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचा स्पष्ट संदेश त्याने दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थित हजारो चाहत्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने आपल्या कमबॅकचे संकेत दिले. त्यामुळे ‘SKY’च्या पुनरागमनाची चाहत्यांना पुन्हा उत्सुकता लागली असून, त्याच्या या वक्तव्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकुमार यादव याला विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात, विशेषतः भोसरी नगरीत दाखल झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

भोसरीतील दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी सूर्यकुमार यादवचे आगमन होताच हजारो चाहत्यांनी ‘SKY… SKY… SKY…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांचा गजर, दहीहंडीचा उत्साह आणि आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी जमलेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक योगेश लांडगे यांनी सूर्यकुमार यादवचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
***

‘ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी’

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा योग आल्याचे सांगत सूर्यकुमार यादवने पुणे-पिंपरी-चिंचवड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असल्याचे म्हटले. मुंबईतून पिंपरी-चिंचवडपर्यंतचा प्रवास पावसाळी वातावरणातही जलद, सुखकर आणि आनंददायी झाल्याचे सांगताना त्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद झाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी सूर्यकुमार यादवने आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचेही कौतुक केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या महेशदादांचे आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य असल्याचे सांगत सूर्यकुमार म्हणाला की, महेश लांडगे यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जन्मापासूनच मुंबईत वास्तव्यास असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रचंड श्रद्धा असल्याचेही त्याने नमूद केले.

‘देशासाठी खेळायचं आणि जिंकायचं’..

सध्याच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत सूर्यकुमार यादवने देशातील नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी संदेश दिला. सध्या क्रिकेटसोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये युवा खेळाडू उत्तम कामगिरी करत असून, ऑलिम्पिक, एशियाड आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावत आहेत, असे त्याने सांगितले. ‘देशासाठी आपल्याला खेळायचंय आणि जिंकायचंय’ ही जिद्द मनात ठेवून प्रत्येक खेळाडूने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही त्याने दिला. तसेच, दहीहंडीच्या निमित्ताने भारतीय सण आणि उत्सवांबद्दलही सूर्यकुमार यादवने आपले मत व्यक्त केले. भारतातील सण, उत्सव आणि परंपरा यांचे प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी अतूट नाते आहे. त्यामुळे देशात असो किंवा परदेशात, आपण आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सण मोठ्या आनंदाने साजरे करतो, असे त्याने सांगितले. आपले सण, उत्सव आणि परंपरा हीच आपल्या भारताची अस्मिता आहे, असेही सूर्यकुमार यादवने यावेळी नमूद केले.

देशाचे नाव जगभरात उंचावणारा खेळाडू कुस्ती आणि कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या पैलवानांच्या भोसरी नगरीत आला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सूर्यकुमार यादव यांच्यासारखे खेळाडू हे खऱ्या अर्थाने देशाचे ‘रिअल हिरो’ आहेत. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाच्या माध्यमातून देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्याचे भोसरीत स्वागत करणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
next post
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!

You may also like

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर पाण्याची टाकी...

March 8, 2025

नवनिर्वाचित पत्रकारांनी अधिक जोमाने समाजपयोगी काम करावे-उपमहापौर शर्मिला...

August 24, 2026

पक्षांच्या पलीकडे विकासाचा अजेंडा: प्रभाग ११(क) मधून निशा...

December 31, 2025

“WPL 2025 अंतिम सामना: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक...

March 25, 2025

अण्णासाहेबांचा संघर्ष आजही प्रेरणादायी – कामगारनेते इरफानभाई सय्यद

September 25, 2026

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे ‘संतोष कांबळे...

October 31, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले...

April 17, 2025

ऐश्वर्यम हमारा सोसायटी पाणी प्रश्नावर आमदार महेश लांडगे...

January 5, 2026

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५...

July 24, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पिंपरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी...

April 14, 2025

पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना...

February 7, 2026

“भररस्त्यात अश्लील चाळे; गौरव आहुजाचा माज...

March 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here