• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
पिंपरी चिंचवडपुणे

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ

by gauravsalunkhe00@gmail.com October 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
18

पिंपरी (प्रतिनिधी) दिनांक २१ ऑक्टोबर २०२६:– दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात सीमोल्लंघन,पथ संंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सांस्कृतिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते (दि.२०)करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी शेकडो बंधू भगिनींनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी ३ वाजता सीमाउल्लंघन कार्यक्रम तसेच पथ संंचलन राष्ट्रीय श्रमिक आघाडी तसेच संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादितच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.पथसंचालनाचे उद्घाटन मा.खासदार श्री अमरजी साबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन संघटनेचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले होते.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅलीला सुरुवात झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच स्वामींचे मंदिरात स्वामींना पुष्पहार अर्पण करून, बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.गंगानगर ते अक्षय सोसायटी YCMH या रस्त्यांच्या सीमाउल्लंघन करण्यापूर्वी माजी नगरसेवक श्री बबनराव गाढवे, भाजपा नेते किरणजी सुवर्णा, भाजप मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, भाजप नेते नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश भाऊ पाटील, शेखर भाऊ पाटील, संदीप नाईक इत्यादी कार्यकर्त्यांनी मा.खासदार अमरजी साबळे व श्री यशवंतभाऊ भोसले यांना श्रीफळ देऊन स्वागत केले.

त्यानंतर वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत श्री गणेश मंदिरात भक्तिभावाने सोनं लुटण्याच्या परंपरेत सहभाग घेतला. आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा व्यक्त करण्याच्या या परंपरेतून परस्परांतील स्नेह, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.विशेष म्हणजे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची ६ वर्षाची नात लिनेशा हिने प्रथमच सोने लुटणे व पथसंंचलन मध्ये सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, विजयादशमीच्या निमित्ताने दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा सीमोल्लंघनाच्या परंपरेतून मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर परिसरात ही परंपरा सुरू करून सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात या परिसराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या उपक्रमाची निश्चितच आठवण राहील. यशवंतभाऊ भोसले यांनी यापूर्वी परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीची परंपराही सुरू केली आहे. या दिंडीत परिसरातील नागरिक, वारकरी आणि भक्तिभावाने सहभागी होणारे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.सीमोल्लंघन आणि आषाढी दिंडी या दोन्ही उपक्रमांमधून स्थानिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच नागरिकांमध्ये एकोपा वाढविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या मनोगतात सीमोल्लंघनाच्या परंपरेमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले. पूर्वी ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन गळाभेट घेत, एकमेकांना शुभेच्छा देत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटण्याची परंपरा पाळत असत. याच परंपरेचे पुनरुज्जीवन संत तुकाराम नगरमध्ये करण्याचा प्रयत्न आहे.

चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले,दीपक शेठ पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे,राहुलजी शितोळे,अंकुशजी वाघमारे, अप्पू जी नायर,ओमकारजी जोकारे, मानसी ताई देशपांडे, लताताई पाटील, चंद्रकांत भालेराव,शालन ताई महापुरे,योगेंद्रजी आरवडे,कैलासजी गव्हाणे,शिरीषजी सासवडे, सतीशजी सासवडे, श्रेयस करे, विनायक जी निकम,जेवियर अँथोनी किसन भाग्यवंत, मल्लेषजी कोरवी, इस्मत सय्यद,दगडू जी लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदामजी गायकवाड,आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश जी भुते,आरतीताई पराळे, उषाताई टाकळकर, सुधाकरजी शिंदे,अंकुशजी गायकवाड, फौजदार गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रियाताई घोरपडे, राजनीताई मगर इत्यादी प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
  • देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
next post
पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे

You may also like

हो,मी असाच आहे नागडा .. – नानांचे बेधडक...

October 8, 2026

“महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था! पीसीसीओईला राष्ट्रीय बौद्धिक संपदा...

April 3, 2025

‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’...

September 3, 2026

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव

December 22, 2025

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

March 11, 2026

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

February 23, 2025

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद...

March 29, 2025

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोठा निर्णय

March 11, 2026

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 821 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 791 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

समन्वय आणि मायक्रो प्लॅनिंगच्या बळावर निवडणुकीची...

October 18, 2026

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव...

March 11, 2026

भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या...

September 28, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here