• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home कला विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
कलापिंपरी चिंचवडपुणे

विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!

by gauravsalunkhe00@gmail.com October 25, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

– एक लाख रुपये रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह अन्‌ भेटवस्तुचा मानकरी
– महाराष्ट्रातील सर्वात मोठी रील स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ दिमाखात

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच स्मारक ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ आणि निर्माणाधीन भगवा धर्मध्वज यांना ढोल-ताशांच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी मानवंदना सोहळ्याचे क्षण सर्जनशील रीलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर पोहोचविणाऱ्या रील निर्मात्यांच्या हिंदूभूषण स्मारक ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. ट्रस्टतर्फे आयोजित खुल्या रील स्पर्धा–२०२६ मध्ये नाशिक येथील मयूर अहेर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना एक लाख रुपयांची रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दि.४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. त्या सोहळ्यानिमित्त आयोजित ‘ब्लॉकब्लास्टर रील’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहमेळावा शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) मोशी येथील सीझन्स बँक्वेट येथे पार पडला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य प्रतापराव मोहिते, पृथ्वीराज लांडगे, सुहास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील ७५० हून अधिक रील निर्मात्यांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे हा सोहळा जगभरात पोहाचला. त्यासोबतच महाराष्ट्रभरात शिव-शंभूप्रेमींनी सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद दिला आहे. पारितोषिक वितरण समारंभाला ६०० हून अधिक स्पर्धत उपस्थित राहीले. त्यामुळे हा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. आमदार लांडगे यांनी सर्व पारितोषिक विजेत्या रिल निर्मात्यांचे अभिनंदन केले.

उद्योजक कार्तिक लांडगे म्हणाले की, ‘‘ घरातील आई आणि गोठ्यातील गाई माझ्यासाठी समान पूजनीय आहे’’ या भावनेतून आमदार महेश लांडगे काम करीत आहेत. देव-देश-धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रखर भूमिका आणि त्याला आयआयएम, सीईओपी, न्यायालय इमारत आणि संविधान भवन उभारणीसाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला. ‘विकासाभिमूख हिंदुत्वा’च्या या कार्यात सर्व रील निर्माते आणि नेटिझन्सची साथ द्यावी.

पुरस्काराचे मानकरी…
या स्पर्धेत यश कदम यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांकाचे मानकरी जय गाडे यांना ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांक विजेत्या हिंदवी भोसले यांना २५ हजार रुपये, तर पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या प्रणव यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पहिल्या पाचही विजेत्यांना रोख रकमेसह स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या विजेत्यांना एकूण २ लाख ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच, सहभागी सर्व रिल निर्मात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

‘रीलस्टार’ म्हणजे उद्याचा भारत घडवणारे युवक आहेत. देव-देश-धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. रील स्पर्धेमुळे शिव-शंभू विचार जगातील कानाकोपऱ्यात आणि नव्या पिढीपर्यंत पोहचणार आहेत. आता वारकरी सांप्रदायामध्ये पवित्र असलेली इंद्रायणी नदी प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आम्ही ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’’चे आयोजन करतो. या उपक्रमातही रील निर्मात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– सचिन लांडगे, कामगार नेते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच शिल्पाला ढोल-ताशा पथकांच्या मानवंदनेचा सोहळा जगभरात पोहोचवण्यासाठी रील निर्मात्यांनी पुढाकार घेतला. वास्तव आणि सत्य दाखवणारे रील स्टार खऱ्या अर्थाने ‘रिअल स्टार’ आहेत. सशक्त राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील सशक्त तरुण घडवण्यासाठी, राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
  • देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
next post
काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

You may also like

चंद्रकांत पाटील यांची आमदार अमित गोरखे यांच्या घरी...

September 2, 2025

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

March 6, 2026

पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

February 21, 2026

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या...

August 18, 2026

महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला...

September 6, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवड जाहीर;...

March 2, 2026

महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे – न्यायाधीश अमृत...

March 9, 2025

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि...

March 16, 2025

📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने...

April 19, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 821 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 791 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन...

January 26, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया...

August 26, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण...

April 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here