• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “अचूक हवामान अंदाजासाठी एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडारची स्थापना”
पिंपरी चिंचवड

“अचूक हवामान अंदाजासाठी एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडारची स्थापना”

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांच्यामध्ये सामंजस्य करार

by gauravsalunkhe00@gmail.com December 5, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
557

हवामान निरीक्षणातील नवे युग”

पिंपरी,४नोव्हेंबर२०२४:– पिंपरी चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान बदलातील विविध आव्हाने सक्षमपणे हाताळण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.

निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे हवामान बदलाचे संकेत देणारा अत्याधुनिक एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडार मनोरा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी निश्चित केलेल्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पुणे येथील भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधीक्षक योगेश वाळूंज तसेच भारतीय हवामान विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ उदय शेंडे, डॉ. शिजो झकारिया, अश्विन राजू डी.के आदी उपस्थित होते. रडार प्रणाली उभारण्यासाठी महापालिकेद्वारे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून हवामान विभागामार्फत त्या ठिकाणी रडार उभारण्यात येणार आहे.

जागतिक स्तरावरील हवामान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि त्यामुळे उद्भवणारी आपत्ती यावर संरचनात्मक उपाय योजना करण्यासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी हवामान व वातावरणीय बदलाच्या माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी दोन्ही संस्थामध्ये झालेला सामंजस्य करार भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या करारानुसार भारतीय हवामान खाते पिंपरी चिंचवड महापालिकेला वेळोवेळी शहरातील हवामानाचे अंदाज तसेच त्याबाबत करावयाच्या उपाय योजना याबाबत सूचना देणारी माहिती पुरवणार आहे. या माहितीच उपयोग महापालिकेला विविध उपाय योजना आणि नियोजन करण्यासाठी होणार असल्याचे आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

“एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडार” एक अत्याधुनिक स्वदेशी रडार प्रणाली आहे. या प्रणालीचे कार्यपरिक्षेत्र सुमारे १०० किलोमीटर परिघात असणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्राचे, गड परिसर आणि आसपासच्या भागांचे समावेश असणार आहे. आपत्तीजनक हवामान घटनांची वास्तविक-समय निरीक्षण क्षमता, अत्याधिक पाऊस, वादळ, गारपीट, इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी या रडारप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरावर परिणाम करणाऱ्या वातावरणीय घटकांची माहिती महापालिकेला वेळोवेळी पुरवली जाणार असल्याचे के.एस.होसाळीकर यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल शहरात आनंदोत्सव साजरा
next post
आता ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे होणार रस्त्यांची देखभाल

You may also like

“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

March 28, 2025

पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी...

April 13, 2025

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला...

November 30, 2024

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि...

March 13, 2025

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित...

January 7, 2026

देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी तसेच कोरेगाव भीमा शौर्य...

December 10, 2024

“कचऱ्यापासून सुंदरतेची निर्मिती: भोसरीतील गुडविल चौकाची स्वच्छता क्रांती”

March 5, 2025

“स्थानिकांची महत्त्वपूर्ण मागणी! अटल बिहारी वाजपेयी उद्यानात गेम...

April 1, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

आकुर्डीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ऍक्शन मोडवर; महावितरणच्या...

January 27, 2026

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६...

February 27, 2026

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या...

December 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here