• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार “महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो महिलांचा उत्सव!”
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवड

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो महिलांचा उत्सव!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 4, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
633

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने केले आयोजन

पिंपरी (४ मार्च २०२५): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने सक्षमा प्रकल्पांअंतर्गत महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दि. ५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता केले आहे. पिंपरी कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणाऱ्या या मेळाव्यात सक्षमा प्रकल्पातील महिलांना सहभागी होता येणार आहे. समाज विकास विभागाच्या वतीने जास्तीत जास्त महिलांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे या मेळाव्यात स्वयं सहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील “स्वयं सहाय्यता बचत गट पुढील वाटचाल” या विषयावर, आणि समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत राबवलेल्या विविध महिला योजनांची माहिती देणार आहेत.

या मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. टाटा स्ट्राईव्हच्या फिल्ड समन्वयक निशा निमसे आणि त्यांचे सहकारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर टाटा स्ट्राईव्हच्या अजिता कर्वे “सक्षमा प्रकल्प माहिती व साध्य” या विषयावर, टाटा मोटर्स गृहिणी विभागाच्या अध्यक्षा शिल्पा देसाई “व्यवसायवृद्धी व मार्केट लिंकेज” या विषयावर, टाटा स्ट्राईव्हच्या सल्लागार अनिता राजन “महिला सक्षमीकरण” या विषयावर, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी “घे भरारी” विषयावर, आणि टाटा ऑटोकॉम इंटेरिअर आणि प्लास्टिक डिझाईनच्या एचआर हेड स्मिता जाधव “महिला एकत्रीकरण” या विषयावर मार्गदर्शन करतील. याशिवाय यशस्वी महिलांचा सत्कार, मनोगत, आणि टाटा गृहिणींची यशस्वी गाथा देखील होणार आहेत.

बचत गटांना सक्षम करणारा प्रकल्प

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राईव्ह) यांच्यात २०२३ मध्ये महिला स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ५ वर्षांमध्ये ५००० स्वयंसहायता गटांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात बचत गटाचे सर्वेक्षण, क्षमता बांधणी, सदस्य प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास आणि नेतृत्व विकास यावर प्रशिक्षण दिले जात आहे.

पिंक ई-रिक्षा योजना

राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक ई-रिक्षा योजना राबवत आहे. या योजनेचा उद्देश महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, आर्थिक व सामाजिक पुर्नवसन, आत्मनिर्भर बनवणे, आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करणे आहे. या योजनेविषयी माहिती मेळाव्यात दिली जाईल.

“सक्षमा प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला दिनानिमित्त, सक्षमा प्रकल्पातील महिलांसाठी आयोजित केलेला हा मेळावा त्यांच्या यशाचा उत्सव ठरेल.”

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२ गुण!”
next post
पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना मेंदूज्वरापासून संरक्षण!

You may also like

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर भरणा, महानगरपालिकेचा...

April 2, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा...

April 15, 2026

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि...

June 18, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी...

March 7, 2025

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे...

March 5, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा...

January 5, 2026

“शासनाची ऐतिहासिक मंजुरी: आमदार निधीतून गृहनिर्माण...

March 6, 2025

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा...

April 21, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here