• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
आरोग्यपिंपरी चिंचवडराजकारणसमाजकारण

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

by gauravsalunkhe00@gmail.com June 3, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
42

रक्तदान शिबिर, पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा; आमदार, महापौर, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

 समाजसेवेच्या कार्याची दखल; ॲड. एस. बी. चांडक यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर

पिंपरी,दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे दिवंगत माजी महापौर कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नवमहाराष्ट्र मैदान, पिंपरी वाघेरे येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ पिंपरी वाघेरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे. अशी माहिती . कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुदाम नाणेकर, हभप जावळे महाराज, बाळा महाराज वाघेरे, अंकुश वाघेरे, जयनाथ शिंदे, अण्णा कापसे, रमेश गोलांडे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

कै. भिकू वाघेरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेसाठी कार्य केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि समाजसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा त्यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत कै. भिकू वाघेरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी, या हेतूने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा उषाताई वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, पिंपरी चिंचवड शहर युवासेना प्रमुख चेतन पवार, नरहरी कापसे, नगरसेविका उषा उर्फ माई काटे, माजी नगरसेवक हनुमंतराव नेवाळे, माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा सुमनताई पवळे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, उद्योजक दिलीपराव देवकर, म्हातोबा देवस्थानचे खजिनदार यशवंत साखरे, उद्योजक विजय काटे, शिवाजी वाघेरे, दत्तात्रय मासुळकर, फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (आप्पा) वाघेरे, पवना सहकारी बँकेचे संचालक बिपीन नानेकर, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, नाणीक उर्फ नरेश पंजाबी, सुवर्णा परदेशी, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, अनिता वाळुंजकर, नव महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य अजय कापरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित राहणार आहेत.

 

कै. भिकू वाघेरे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम हा केवळ अभिवादनाचा नसून समाजहिताच्या कार्याला चालना देणारा उपक्रम ठरणार आहे. कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने कै. भिकू वाघेरे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा जागर करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
next post
‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप

You may also like

डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे...

February 9, 2026

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची...

December 11, 2025

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण...

March 11, 2026

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी...

July 26, 2026

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर पाण्याची टाकी...

March 8, 2025

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ साठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जोरदार...

January 29, 2026

वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड....

February 5, 2026

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष...

February 22, 2026

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार...

January 7, 2026

पिंपरीत युवासेनेचे शुभम मुळे यांचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश;...

January 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची...

January 31, 2026

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज...

March 16, 2025

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark...

June 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here