• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा मोठा आढावा”
पिंपरी चिंचवड

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा मोठा आढावा”

by gauravsalunkhe00@gmail.com February 21, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
573

पिंपरी, २१ फेब्रुवारी २०२५ : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. या अनुषंगाने प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी गुरुवार (२० फेब्रुवारी) रोजी महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

याप्रसंगी भांडार विभागाचे उप आयुक्त निलेश भदाणे, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखळे, स्थापत्य विभागाचे अभियंता बाळासाहेब शेटे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी दिपक पवार यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, महानगरपालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, महानगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, अशा विविध बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे.

शंभर दिवसांच्या या कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभाग, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, करसंकलन व कर आकारणी विभाग येथे आतापर्यंत कशा पद्धतीने काम करण्यात आले आहे, याचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी थेट यासर्व विभागांना भेट दिली. तसेच कृती कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांचे जीवन सुखकर करण्यास प्राधान्य देणे आपल्या मुलभूत कर्तव्यांचा महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागात हा कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कृती कार्यक्रमांचा आढावा सातत्याने घेण्यात येत असून त्यासाठी प्रत्यक्ष विभागांना भेटी देण्यात येत आहेत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्समधील नवसंशोधनाची चर्चा”
next post
“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची नवी कमान, प्रशांत साळुंखे अध्यक्षपदी”

You may also like

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल अध्यक्षांची घोषणा”

April 20, 2025

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!

January 30, 2026

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे...

April 12, 2026

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल...

April 3, 2025

आज सकाळपासून GPay, PhonePe बंद! वापरकर्ते सोशल मीडियावर...

April 12, 2025

आकुर्डीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ऍक्शन मोडवर; महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली...

January 27, 2026

“आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 9, 2026

“शब्दांना कृतीची जोड! आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन...

June 3, 2025

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची...

April 15, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38...

January 2, 2026

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा –...

July 12, 2025

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड...

January 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here