• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पिंपरी चिंचवडराजकारण

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
25

मोठी घोषणा ; प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार ”प्रॉपर्टी कार्ड”

निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पिंपरी, 6 जानेवारी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे. प्रत्येक प्लॉटवरील प्रत्येक घराचा सरकारी नकाशा गुगल क्लाऊडवर दिला जाणार आहे, ज्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नकाशा दिसणार आहे. पाचशे वर्षानंतरही आपले घर आपल्याला गुगलवर दिसेल. ही सर्व प्रक्रिया मोफत केली जाणार आहे असे देखील बावनकुळे म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग 17, 23 आणि 24 येथील उमेदवारांसाठी वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप उपस्थित होते. दरम्यान सभेसाठी प्रभाग 17 मधील आशा सूर्यवंशी, नामदेव ढोके, पल्लवी वाल्हेकर, सचिन चिंचवडे तर प्रभाग 23 मधील मनीषा प्रमोद पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे आणि प्रभाग 24 मधील उमेदवार सिद्धेश्वर बारणे, करिष्मा बारणे, गणेश गुजर आणि शालिनी गुजर हे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मी राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली . या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले. महापालिका निवडणुका झाल्यानंतर आपण आमदार शंकर जगताप यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून घेणार आहोत. मी स्वतः या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यासाठी शहरात येणार आहे. याशिवाय आपण येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊड वर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यातून एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज तयार होणार आहे. ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे. सरकार विशेष बाब म्हणून या सर्व घरांचे ड्रोन मॅपिंग करून नागरिकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. त्यामुळे यापुढील काळात तहसीलदाराकडे चकरा मारावे लागणार नाही. याचा लाखो परिवाराला दिलासा मिळणार आहे. हे निर्णय होण्यासाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपला आपले मतदान महत्त्वाचे आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी 2017 पासून शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचा आलेख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रगतीच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ”विकासाचे व्हिजन” साध्य करायचे आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी मतांच्या रूपाने पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले

बचत गटांना मिळणार लाखाचे अनुदान

नागपूरमध्ये जशी महिला बचत गटांना अनुदान योजना उपलब्ध करून दिली गेली. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले. निवडून आल्यावर शहरातील महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाईल.मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजना भाजपचे सरकार असेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’ पुन्हा चर्चेत समर्थकांमध्ये विजयाची चाहूल
next post
पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may also like

अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर मिलिटरी हद्दीतील १८ मीटर...

December 23, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी...

December 22, 2025

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर जगताप यांच्या...

December 20, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या –...

March 14, 2026

. “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी...

March 5, 2025

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

“पिंपरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या...

April 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह...

January 27, 2025

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा...

June 21, 2025

आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’...

December 16, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here