Home पिंपरी चिंचवड मानव कांबळे यांची अंनिस पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड – विज्ञानवादी चळवळीला नवी ऊर्जा!

मानव कांबळे यांची अंनिस पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड – विज्ञानवादी चळवळीला नवी ऊर्जा!

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments
मानव कांबळे अंनिस पुणे जिल्हाध्यक्ष ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे,विज्ञानवादी चळवळ महाराष्ट्र,मानव कांबळे फेरनिवड अंनिस,अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र,पुणे जिल्ह्यात विज्ञानवादी आंदोलन,अंनिस पुणे जिल्हा कार्यकारिणी 2025

“अंधश्रद्धेविरोधातील लढ्याला बळ!

पुणे | 19 मार्च 2025: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी जिल्ह्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अंनिसच्या कार्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नव्या कार्यकाळातही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मानव कांबळे यांनी गेल्या दोन वर्षांत अंनिसच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार, तरुणांना विज्ञाननिष्ठ विचारसरणीकडे वळविण्याचे उपक्रम आणि ग्रामीण भागात अंनिसच्या शाखांचा विस्तार यावर त्यांनी भर दिला.

नव्या जबाबदारीबद्दल बोलताना मानव कांबळे म्हणाले,

“गेल्या दोन वर्षांत अंनिसच्या माध्यमातून आम्ही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे लोकांची दिशाभूल होत आहेत. याविरोधात तरुणांनी उभे राहण्याची गरज आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत वैज्ञानिक विचारांना जाणीवपूर्वक मागे टाकले जात आहे, याविरोधात आम्ही ठाम भूमिका घेऊ. पुढील काळात ज्या ठिकाणी अंनिसच्या शाखा नाहीत, तिथे शाखा सुरू करण्यावर भर देऊ. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनुसार विवेकवादी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन बळकट करण्यासाठी मी माझे संपूर्ण योगदान देईन.”

संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन

मानव कांबळे यांच्या फेरनिवडीचे अंनिसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अंनिसने पुणे जिल्ह्यात मोठी प्रगती केली असून, पुढील कार्यकाळातही ही गती कायम राहील, असा विश्वास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

युवकांना वैज्ञानिक विचारसरणीकडे वळवण्याचा संकल्प

मानव कांबळे यांनी सांगितले की, “आम्ही विशेषतः युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी नवे उपक्रम हाती घेणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ एक आंदोलन नाही, तर समाजाच्या भविष्याशी निगडीत जबाबदारी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्ही तरुणांना जागरूक करण्याचा प्रयत्न करू.”

पुढील कार्यकाळातील उद्दिष्टे

नव्या शाखांचा विस्तार: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अंनिसच्या शाखा स्थापन करणे.

महाविद्यालये व शाळांमध्ये जनजागृती मोहीम: विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार शिकवणे.

सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भाष्य: वैज्ञानिक विचारांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी लढा देणे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार: तरुणांमध्ये विज्ञान आणि विवेकवादाचा प्रसार करणे.

जिल्हा कार्यकारिणीची निवड चिंचवड येथे झालेल्या जिल्हा प्रेरणा मेळाव्यात जाहीर करण्यात आली. निवड प्रक्रिया राज्य कार्यकारीणी सदस्य दिगंबर कट्यारे, ॲड.मनीषा महाजन आणि उत्तम जोगदंड यांनी पार पाडली. तर संजय बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.

हे ही वाचावे

“ज्ञानाची भेट! सहारा वृद्धाश्रमासाठी पुस्तकदान”

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती – पुणे जिल्हा कार्यकारिणी (2025-27)

जिल्हाध्यक्ष: मानव कांबळे

जिल्हा उपाध्यक्ष: वनिता फाळके,बाळासाहेब घस्ते

जिल्हा कार्याध्यक्ष: सम्यक व्ही. एम.

जिल्हा प्रधान सचिव: संजय बारी, मनोहर पाटील

विभागीय कार्यवाह:

विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग: गंगाधर सत्वधर

विविध उपक्रम विभाग: एकनाथ पाठक

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग: अतुल सवाखांडे

महिला विभाग व कायदेविषयक व्यवस्थापन विभाग: अॅड. परिक्रमा

युवा सहभाग विभाग: अरिहंत अनामिका

विवेकी निवड विभाग: सतीश जाधव, पूनम जाधव

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग: राहुल उजागरे

सोशल मीडिया विभाग: कृष्णा भिसे

संविधान जागर अभियान विभाग: नम्रता ओव्हाळ मोरे,

विज्ञान बोध वाहिनी विभाग: महेश घाडगे

अधिक जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

मानव कांबळे यांची अंनिसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड ही सामाजिक चळवळीला नवसंजीवनी देणारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अंनिसच्या पुणे जिल्ह्यातील कार्याचा विस्तार होईल, अशी आशा आहे. विज्ञाननिष्ठा, विवेकवाद आणि लोकशाही मूल्ये दृढ करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली नवे उपक्रम हाती घेतले जातील.

विवेकाचा आवाज बुलंद करूया!

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment