• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये भावी आर्किटेक्ट्सना केले मार्गदर्शन
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये भावी आर्किटेक्ट्सना केले मार्गदर्शन

by gauravsalunkhe00@gmail.com February 9, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
38

शॉर्ट-कटऐवजी सेन्सेटिव्ह सिटीजवर भर द्यावा; आमदार अमित गोरखे यांचा फर्ग्युसन कॉलेजममधील विद्यार्थ्यांशी संवाद

पिंपरी चिंचवड – ९ फेब्रुवारी २०२६:

पिंपरी चिंचवड : वास्तुकला म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि स्टीलची मांडणी नसून, ती मानवी वर्तन, विचार आणि भावनांवर होणारा खोलवर परिणाम आहे. आजच्या तरुण पिढीने जागतिक डिझाइन्सची आंधळी नक्कल करण्यापेक्षा भारतीय संस्कृती, हवामान आणि मानवी संवेदनशीलता यांचा विचार करून भविष्यातील भारताचा पाया रचावा. तुमचे डिझाइन केवळ इन्स्टाग्रामवर दिसण्यासाठी नको, तर ते इतिहासात नोंदवले जाईल अशा गुणवत्तेचे असावे, असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी केले.


डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित ‘Elevation 2026’ या उपक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद आणि मोठ्या संख्येने भावी आर्किटेक्ट्स व इंटीरियर डिझाइनर्स उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार गोरखे म्हणाले की, देशाची प्रगती केवळ जीडीपी (GDP) सारख्या आकड्यांमधून दिसत नाही, ती अनुभवातून दिसते. देशाची ओळख वास्तूंमधून होते. ताजमहाल, संसद भवन किंवा अजिंठा-वेरूळची लेणी आजही आपल्याशी संवाद साधतात. आपल्या पूर्वजांनी वास्तुकलेला केवळ व्यवसाय न मानता ‘धर्मा’सारखे पवित्र मानले. त्यांनी निसर्गाशी झुंज दिली नाही, तर निसर्गाशी संवाद साधला. हेच तत्वज्ञान आजच्या आधुनिक वास्तुविशारदांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.

शॉर्ट-कट आर्किटेक्चर
सध्याच्या परिस्थितीवर बोलताना आमदार गोरखे यांनी नमूद केले की, बजेट आणि वेळेच्या कमतरतेमुळे होणारे ‘शॉर्ट-कट आर्किटेक्चर’ दीर्घकालीन समस्या निर्माण करते. आपल्याला केवळ ‘स्मार्ट सिटीज’ नको आहेत, तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या ‘सेन्सेटिव्ह सिटीज’ हव्यात. बी. व्ही. दोशी आणि चार्ल्स कोरिया यांनी घालून दिलेल्या आदर्शांप्रमाणे गरिबांनाही वास्तूतून प्रतिष्ठा मिळायला हवी.

भारतीय जीवनशैलीचा आदर
इंटीरियर डिझाइन म्हणजे वास्तूचा आत्मा इंटीरियर डिझाइनच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, आर्किटेक्ट इमारतीचे शरीर उभे करतो, तर इंटीरियर डिझाइनर त्यात ‘आत्मा’ फुंकतो. प्रकाश, ध्वनी, स्पर्श आणि रंगांचे संतुलन म्हणजे खरे डिझाइन. एक शाळा मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करू शकते किंवा एक हॉस्पिटल रुग्णाला आशा देऊ शकते; ही किमया तुमच्या हातात आहे. विदेशी मॅगझिनची नक्कल करण्यापेक्षा भारतीय जीवनशैलीचा आदर करणारे डिझाइन्स तयार करा.

विकसित भारताचा पाया तुमच्या हातात!
२०४७ चा समृद्ध भारत भाषणांनी मोठा होणार नाही, तर तो भक्कम ‘फाऊंडेशन’वर उभा राहील. या भविष्याचा पाया रचण्याची जबाबदारी माझ्या समोर बसलेल्या तरुण पिढीची आहे. तुम्ही केवळ इमारती उभारणार नाही, तर भारताची समृद्ध संस्कृती उभारणार आहात, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत व्यापक अतिक्रमण कारवाई
next post
शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर रवि लांडगे

You may also like

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवड जाहीर;...

March 2, 2026

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित...

December 19, 2025

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल...

April 3, 2025

Phoenix Metro News “अरिजित सिंहच्या कॉन्सर्टने पुणेकर मोहित!...

March 17, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना...

March 4, 2026

“भररस्त्यात अश्लील चाळे; गौरव आहुजाचा माज उतरला, हात...

March 8, 2025

“३१ मार्च आज शेवटची संधी! थकबाकीदारांची मालमत्ता कोणत्याही...

March 31, 2025

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी...

December 21, 2025

Breaking News: चऱ्होली TP Scheme अखेर रद्द –...

May 29, 2025

पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीएमएल पास द्या –...

June 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा...

January 9, 2026

विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल...

January 15, 2025

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे...

January 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here