• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home महाराष्ट्र राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आमदार महेश लांडगे यांनी घेतले आशीर्वाद
महाराष्ट्रपिंपरी चिंचवडराजकारण

राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आमदार महेश लांडगे यांनी घेतले आशीर्वाद

by gauravsalunkhe00@gmail.com September 18, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
27

– ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांकडून विशेष कौतुक
– वस्ताद किसनराव लांडगे आणि हजारे कुटुंबीयांमधील जुन्या स्नेहाला उजाळा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच, विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.

आमदार महेश लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ मैत्री आहे. वस्ताद किसनराव लांडगे हे अण्णांना भेटण्यासाठी अनेकदा राळेगणसिद्धीला जात असतात. त्यामुळे लांडगे आणि हजारे कुटुंबीयांमध्ये आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना, सुरू असलेली कार्यवाही आणि भावी पिढ्यांसाठी या स्मारकाचे असलेले ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांनी अण्णा हजारे यांना माहिती दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या भव्य स्मारकाच्या उभारणीचे अण्णा हजारे यांनी विशेष कौतुक केले. सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा सल्लाही त्यांनी आमदार लांडगे यांना दिला.

अण्णा हजारे यांनी ग्रामविकास, व्यसनमुक्ती, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी आयुष्यभर केलेले कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्यासारख्या तपस्वी व्यक्तिमत्त्वाची भेट आणि मार्गदर्शन आपल्याला लोकहिताच्या कामासाठी नवी ऊर्जा देणारे असल्याची भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

अण्णांचे मार्गदर्शन म्हणजे नवी ऊर्जा : आमदार महेश लांडगे

“माझे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि आदरणीय अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे अण्णांसोबत आमचा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे. राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आशीर्वाद घेतले. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांनी केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे मार्गदर्शन लोकहितासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची नवी ऊर्जा देते.”

You Might Also Like
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’
next post
यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान मानव कांबळे यांना जाहीर

You may also like

पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या...

January 8, 2026

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार...

January 28, 2026

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा विजय, संतभूमीत...

June 21, 2025

“आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात आक्रमक भूमिका –...

March 29, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या –...

March 14, 2026

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट,...

February 27, 2026

सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय; ‘हा जनतेच्या विश्वासाचा...

January 3, 2026

BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी...

December 27, 2025

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 821 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली...

April 11, 2025

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी...

March 14, 2026

हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार 2025...

November 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here