• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात राष्ट्रवादीत
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात राष्ट्रवादीत

by gauravsalunkhe00@gmail.com December 22, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
95

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठे खिंडार; राजेश आरसूळ दोन हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

पिंपरी :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठ्या उलथापालथींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांत हालचाली वाढल्या असताना आता शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, खासदार श्रीरंग बारणे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहर प्रमुख राजेश आरसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे राजेश आरसूळ यांनी आपल्या पत्नी सौ. मनीषा राजेश आरसूळ यांच्यासह आणि जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. पुण्यात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर निवडणूक प्रमुख नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना घडलेला राजेश आरसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा केवळ पक्षांतर नसून, शहरातील आगामी राजकीय लढतीच्या दृष्टीने तो अत्यंत निर्णायक मानला जात आहे. गेल्या काही काळात भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने दबाव वाढवण्यात येत होता. अनेक नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र, या पक्षप्रवेशामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.

या प्रवेशामुळे विशेषतः वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १७ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल अधिक मजबूत झाले असून भाजप व शिवसेनेसाठी ही बाब निश्चितच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने प्रचारयंत्रणेला बळ मिळाले आहे.

पक्षप्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौ. मनीषा राजेश आरसूळ यांचे विशेष कौतुक केले. “युवक-युवतींना संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. सौ. मनीषा आरसूळ यांच्यासारख्या अभ्यासू आणि ऊर्जावान उमेदवारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सौ. मनीषा राजेश आरसूळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वासोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.” तसेच नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि निवडणूक प्रमुख नाना काटे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले.

एकूणच, राजेश आरसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक रणधुमाळीत नवे वळण मिळाले असून, येत्या काळात आणखी राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव
next post
पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

You may also like

“दुबईत घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा नारा; सचिन...

May 8, 2025

पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

February 21, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय...

January 7, 2026

“पिंपरीच्या इंजिनीअर आईने बनवला जगातील पहिला AI स्मार्ट...

April 16, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील...

January 7, 2026

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे...

March 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा...

January 8, 2026

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’...

February 28, 2025

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद!...

June 30, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here