• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या विचार प्रबोधन पर्वात भव्य महानाट्याला उस्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवडकलापुणे

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या विचार प्रबोधन पर्वात भव्य महानाट्याला उस्फूर्त प्रतिसाद

by gauravsalunkhe00@gmail.com February 18, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
63

पिंपरी, दि. १८ फेब्रुवारी २०२६: ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसर दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली.

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसदस्य अमित गावडे, राजू मिसाळ, अभिषेक बारणे, चेतन भुजबळ, शैलजा मोरे, अर्चना कारंडे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२५० हून अधिक कलाकारांचा सहभाग
मा. राष्ट्रपती महोदयांसमोर यापूर्वी सादर झालेल्या या भव्य महानाट्यात सुमारे २५० हून अधिक कलाकारांनी सहभाग नोंदवला. घोडे, उंट, पारंपरिक वेशभूषा, भव्य नेपथ्य, अत्याधुनिक प्रकाशयोजना, प्रभावी ध्वनीसंयोजन आणि नेत्रदीपक आतषबाजीमुळे प्रत्येक प्रसंग जिवंत झाल्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. प्रत्येक दृश्यानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला.
शिवचरित्रातील ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण
महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा सामाजिक-राजकीय कालखंड, बालपण, संत तुकाराम महाराजांसोबतची ऐतिहासिक भेट, तोरणा विजय, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, शेतकऱ्यांसाठीचे आज्ञापत्र, प्रतापगड मोहीम, पन्हाळगड वेढा व सुटका, आरमार उभारणी, पुरंदरचा तह, आग्रा भेट, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा विजय आणि भव्य शिवराज्याभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सजीव चित्रण करण्यात आले.

या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत झाली. अनेक प्रेक्षक उभे राहून कलाकारांना दाद देताना दिसले.

सुयोग्य नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था
कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी सुयोग्य बैठक व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे व सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्या अधिपत्याखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.

आणखी दोन प्रयोगांची संधी
‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आणखी दोन प्रयोग १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता याच ठिकाणी सादर होणार आहेत. या भव्य महानाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौरांचे मत
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले,
“‘शिवगर्जना’ या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि सुशासनाच्या तत्त्वांची प्रभावी मांडणी नव्या पिढीसमोर होत आहे. इतिहास केवळ वाचण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा आहे. अशा सादरीकरणातून युवकांना स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा मिळेल आणि राष्ट्राभिमान अधिक दृढ होईल, असा विश्वास आहे.”

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
next post
राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

You may also like

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे...

February 20, 2026

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले यांची मोठी...

February 22, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनावर महिला बचत गटांचा...

March 8, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवड जाहीर;...

March 2, 2026

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि...

March 13, 2025

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल...

August 21, 2025

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू समाजाचा निषेध...

April 27, 2025

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी सोहळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...

August 23, 2025

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीएमएल पास द्या –...

June 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 798 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 793 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 766 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रभाग २८ मध्ये भाजपचा विकास एल्गार;...

January 7, 2026

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप...

February 24, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत;...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here