• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान

by gauravsalunkhe00@gmail.com February 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
67

माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल, महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर

हा सन्मान पिंपरी चिंचवड शहरवासियांचा-महापौर रवि लांडगे

पिंपरी :- २१ फेब्रुवारी २०२६ पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर झाले असून आज राज्यस्तरीय आयोजीत सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महापौर रवि लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ च्या राज्यस्तरीय अंतिम निकालात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवित सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची किमया साधली.

‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित विविध पर्यावरणीय निकषांवर शहरांची कामगिरी तपासण्यात आली. या निकषांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन, स्त्रोतस्थानी कचरा विलगीकरण, निर्माल्य पुनर्प्रक्रिया प्रकल्प, एकल-वापर प्लास्टिकमुक्त मोहीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलसंधारण उपक्रम, सौरऊर्जा वापर तसेच हरित पट्टा विस्तार या क्षेत्रांत प्रभावी अंमलबजावणी केली.

शहरातील पर्यावरणीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणताना प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आणि व्यापक जनसहभागाला विशेष प्राधान्य दिले.

सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि पायाभूत पर्यावरणीय प्रगतीची ठोस साक्ष आहे. या यशामुळे शहर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरले असून, भविष्यात अधिक नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत उपक्रम राबवून हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक शहर घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे हा संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात शहराने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि परिणामकारक कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. हे यश केवळ महापालिकेचे नसून शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या, नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्योग क्षेत्र आणि सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे.

रवि लांडगे
महापौर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

शाश्वत विकासाच्या दिशेने शहराची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, पारदर्शक अंमलबजावणी आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय निकषांमध्ये उल्लेखनीय सुधारणा साधली आहे. भविष्यातही हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा आमचा निर्धार कायम राहील.

श्रावण हर्डीकर
आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश — डॉ. विजय तनपुरे
next post
पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लकी ड्रॉ पद्धतीने होणार गाळे (स्टॉल) वाटप

You may also like

हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड ते मामुर्डी...

November 8, 2025

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती...

February 19, 2026

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार अमित गोरखे...

April 8, 2026

पिंपरीत भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य...

January 10, 2026

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला जाणे होणार...

March 23, 2025

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

पुणे-बीडमध्ये ४० किमी/h वेगाने वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटाचा इशारा!...

May 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५...

May 26, 2025

“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव...

October 16, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई!

December 17, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here