• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड : परराज्यातील नागरिकांसाठी ‘वर्क परमिट’ सक्तीचे करा; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड : परराज्यातील नागरिकांसाठी ‘वर्क परमिट’ सक्तीचे करा; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com February 25, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
79

पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात परराज्यातून काम, व्यवसाय किंवा नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी नोंदणीकृत ‘वर्क परमिट’ प्रणाली लागू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि प्रशासनिक नियंत्रणासाठी ही उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगारनगरी आणि उद्योगांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह नेपाळ तसेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांतून मोठ्या प्रमाणावर कामगार व नागरिक स्थायिक होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भाडेकरूंची नोंदणी करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात शंभर टक्के नोंदणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस आणि पालिका प्रशासनाने समन्वय साधून परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नाममात्र शुल्क आकारून वर्क परमिट सक्तीचे करावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

भोईर यांनी पुढे नमूद केले की, पिंपरी-चिंचवड हे सर्वांना रोजगाराची संधी देणारे शहर आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी येथे कष्टाने घरे उभारून स्थायिक जीवन सुरू केले आहे. स्थानिक भूमिपुत्रांसह कायमस्वरूपी राहणाऱ्या नागरिकांचा शहरावर पहिला हक्क आहे. इतर राज्यांतील नागरिकांनाही शहराने कधी परके मानले नाही; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नोंदणी यंत्रणा उभी राहणे आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यात सांगवी परिसरात एका घरात बेकायदेशीररीत्या परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील औद्योगिक, हॉटेल, बांधकाम तसेच इतर क्षेत्रांत कार्यरत सर्व परराज्यातील कामगारांसाठी वर्क परमिट अनिवार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित व्यवसायांच्या मालकांनाही कामगारांचे वर्क परमिट व चरित्र पडताळणीची जबाबदारी देण्यात यावी, असे त्यांनी सूचित केले.

पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त उपक्रमातून वर्क परमिट व चरित्र पडताळणी प्रक्रिया राबविल्यास शहरातील एकूण स्थायिक नागरिक व तात्पुरते कामगार यांची अचूक माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रशासनावर येणारा ताण कमी करणे शक्य होईल, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या मागणीबाबत पालिका प्रशासन व पोलिस विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार
next post
सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये दणदणीत विजय

You may also like

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

वाकड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; आयटी हबकडे जाणारा मार्ग...

July 2, 2025

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत...

March 17, 2026

नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे यांची वायसीएम...

February 13, 2026

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी...

August 20, 2025

‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; मूलभूत...

March 11, 2026

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी सोहळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...

August 23, 2025

शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ : नियोजनासाठी...

January 27, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 970 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज...

March 16, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

February 21, 2026

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये...

January 11, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here