• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा गटातील शंभर कार्यकर्ते भाजपच्या गोटात!”
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा गटातील शंभर कार्यकर्ते भाजपच्या गोटात!”

by gauravsalunkhe00@gmail.com November 12, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
74

पिंपरी, 11 नोव्हेंबर (प्रतिनिधी):

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आमदार शंकर जगताप यांच्यावर निवडणूक प्रमुखपदाची मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय रणनीतींची अंमलबजावणी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या एका भव्य कार्यक्रमात शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवकांच्या पत्नीसह शंभरहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला आहे.

🔸आमदार शंकर जगताप यांची निवडणूक रणनीती सुरू!

भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार शंकर जगताप हे शांत, संयमी आणि प्रशासनिक दृष्टीने सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी अलीकडेच सोसायट्यांमधील भेटीगाठी, संवाद मेळावे आणि नागरिकांच्या अडचणींवर उपाययोजना अशा माध्यमातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्याचसोबत आता इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचे मोहिमेचे स्वरूप त्यांनी घेतले आहे.

🔸 उबाठा गटातील मोठी फूट!

या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी आणि उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ यांनी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक १७ मधील आजी-माजी पदाधिकारी, माजी सभागृह नेते, नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔸 भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रमुख नावे

 

सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, प्रदीप भदाणे, नितीन पाटील, पल्लवी वाघ, योगेश माळी, रवींद्र जगताप आणि अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपचा झेंडा हातात घेतला.

🔸 “शहराच्या विकासासाठी भाजपच सक्षम” — रजनी वाघ

भाजपच्या सत्ताकाळात शहरात मेट्रो मार्गांचे विस्तृत जाळे, नवनवीन प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणा झाल्याने पिंपरी चिंचवडचा कायापालट झाल्याचे रजनी रघुनाथ वाघ यांनी सांगितले.

त्यांनी म्हटलं, “नागरिकांचा विश्वास भाजपवर आहे. शहराचा विकास केवळ भाजपच्या माध्यमातूनच शक्य आहे, म्हणूनच आम्ही पक्षात प्रवेश केला.”

🔸 “या निवडणुकीत महापौर भाजपचाच!” — आमदार शंकर जगताप

आमदार शंकर जगताप म्हणाले,

“पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आमच्यासाठी केवळ राजकीय नव्हे तर विकासाची लढाई आहे. शहरातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक आम्ही जिंकणारच. महापौर भाजपचाच असेल, हा आमचा ठाम विश्वास आहे.”

🔸 राजकीय समीकरणात उलथापालथ

या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा महापालिकेत बहुमत मिळवून सत्तेवर येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

 

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड ते मामुर्डी रस्ता पूर्ण क्षमतेने खुला होणार
next post
मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर, कार्यकर्त्यांकडून उमेदवार ठरवण्याची मोहीम सुरू

You may also like

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय...

August 18, 2025

“प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने...

March 31, 2025

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि...

March 16, 2025

“पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडिया ने जागतिक एरोडिझाईन स्पर्धेत...

April 27, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी...

March 7, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

“घोटाळ्यांना Full Stop… आता विकासाला Fast Track!” –...

June 14, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची...

February 19, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 973 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 766 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 760 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 730 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

संविधानाच्या अंमबजावणीतुनच मुस्लिमांचा विकास शक्य –...

December 14, 2024

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’...

February 20, 2025

वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा...

March 2, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here