• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष!
पिंपरी चिंचवडकलापुणेमनोरंजनमहाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष!

by gauravsalunkhe00@gmail.com February 27, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
75

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शाहिरी आणि लोकगीतातून मराठी संस्कृतीला मानवंदना

पिंपरी, दि. २७ फेब्रुवारी २०२६ : खंजिरीच्या ठेक्यावर दणदणणारा भारदस्त आवाज… शब्दागणिक सामाजिक प्रबोधनाची ठिणगी पेटवणारी शाहिरी… आणि लोकसंगीताच्या सुरावटीतून मायमराठीच्या अस्मितेचा, परंपरेचा व अभिमानाचा जागर घडवणारा सुरेल महोत्सव… अशा दिमाखदार वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘माय मराठीची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला. सुर, ताल आणि ओजस्वी शब्दांच्या संगमातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे जणू मराठी संस्कृतीच्या वैभवाचा साक्षात उत्सवच ठरला.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहकार्याने
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महापालिकेने विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्यातर्फे ‘माय मराठीची गौरवगाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण संदेश विठ्ठल उमप, शाहीर पृथ्वीराज माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

साहित्य, लोकपरंपरा आणि संस्कृतीच्या सुरेल संगमातून साकारलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांच्या मनात अभिमानाची दीपमाळ प्रज्वलित केली. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, तिचा ऐतिहासिक वारसा आणि अस्मितेची ओळख यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. संदेश विठ्ठल उमप आणि शाहीर पृथ्वीराज माळी यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच प्रेक्षागृहात महाराष्ट्रप्रेमाची लहर उसळली. ‘जयोस्तुते’, ‘हे सुरानो चंद्र व्हा’, ‘गवळण’, ‘मी डोलकर’, ‘बगळ्यांची मान फुले’, ‘किती सांगू मी सांगू’, ‘नेसते पैठणी चोळी’, ‘तरी म्या सांगता होतो’, ‘जांभूळ’ आख्यान, ‘आम्ही ठाकरं’, ‘लिंगोबाचा डोंगर’ अशा गीतांनी लोकसंस्कृतीची सजीव झलक साकारली. ‘फु बाई फु’, ‘माझी मैना’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘लग्नाला चला’, ‘म्यानातून उसळे’, ‘मुंबईत उंचावरी’, ‘दादा आम्ही’, ‘आज कोळीवाऱ्यात’, ‘मध्यंतर हंडा’ अशा विविधरंगी सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. अखेरीस ‘ने मजसी ने’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाचा समारोप होताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.

संदेश विठ्ठल उमप यांना प्रवीण डोणे, विजय कर्जावकर, धीरज पारकर, रागिणी मुंबईकर, कोमल दांडे, वैशाली गोखले, प्रज्ञा वळंजू या गायकांनी सुरेल साथ दिली. तर वाद्यवृंदात महेश लोखंडे, अशोक नरवडे, किरण यादव, माही ढोके, संजय गायकवाड, तृषार्त जामसंडेकर, ऋषिकेश मोहिते, प्रवीण मोरे यांनी आपल्या ताल-सुरांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

शाहीर सम्राट देवानंद माळी यांच्यासह महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अरुण बो-हाडे यांच्यासह रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. कार्यक्रमाचे निवेदन संतोष लिंबोरे यांनी केले.

सामाजिक जाणीव व सांस्कृतिक अस्मितेचा संगम

शाहीर पृथ्वीराज माळी यांनीही आपल्या दमदार आवाजातून ‘गोंधळाला या ग’, ‘सुंदर ते धान्य’, ‘सांगा धनाचा साठा’, ‘माझ्या भीमराया’, ‘गाडी घुंगराची आली’, ‘पोवाडा महाराष्ट्राचा’, ‘आंबा लाडे लाडे’, ‘जोगवा’ ही गीते सादर करत सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अस्मितेचा संगम घडवला. शाहीर पृथ्वीराज माळी यांना शाहीर अभंगराज माळी, अवधूत पवार, आदिती पवार यांनी साथ दिली, तर ढोलकीवर राजू घोलप यांच्या ठेक्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यास वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग
next post
सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू ६ वरून १४, लवकरच एनआयसीयू सुरू; कंत्राटी संस्थेच्या चौकशीचे आदेश

You may also like

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल...

September 10, 2026

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

“ऑफिस पॉलिटिक्सचा खेळ संपला! या १० स्मार्ट ट्रिक्स...

March 25, 2025

३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण; दगडूशेठ गणपतीचा...

September 2, 2025

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;

September 1, 2026

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा...

November 12, 2025

पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला...

January 9, 2026

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’...

May 27, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 798 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 793 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 766 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता...

March 20, 2026

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ...

December 11, 2025

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज...

December 31, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here