• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम

by gauravsalunkhe00@gmail.com February 22, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
52

पिंपरी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ – राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजं रुजवणाऱ्या छत्रपती शिवबांचा इतिहास जेव्हा कवितेच्या शब्दांतून जिवंत होतो, तेव्हा मातृत्व, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. समई आणि वात जशी अंधार चिरून प्रकाशाची दिशा दाखवतात, तशीच जिजाऊंच्या संस्कारांची ज्योत आणि शिवबांच्या कर्तृत्वाची कहाणी आपल्या सशक्त शब्दांतून उलगडत लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘आई’ या विषयावरील आपल्या कवितांच्या सादरीकरणातून स्वराज्याच्या जडणघडणीतील मातृत्वाची भूमिका प्रभावीपणे अनुभवायला लावली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या कवितांद्वारे चिंचवड येथील संभाजीनगर येथे पार पडला.

या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, तुषार हिंगे, कुशाग्र कदम, माजी महापौर मंगला कदम तसेच महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे, सहखजिनदार मंगेश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी साई किरण मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी “हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय..” ही प्रा. स. ग. पाचपोळ यांची कविता स्वतः सुरबद्ध केलेल्या चालीमध्ये सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर आईच्या त्याग, माया, संघर्ष आणि प्रेम यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या कविता सादर करत त्यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

माय तान्ह्या लेकराला, सत्य सांगे जिजाबाई, देवा शिवबा नावाची, जन्मा आली हो नवलाई…, तुझ्यामुळे या जन्माला खरा अर्थ मिळाला, नाहीतर माझा श्वासही व्यर्थच राहिला…, जात्यामध्ये धान्य नाही तरीही माय ओढायची, डोळ्यामध्ये पाणी नाही तरी माय रडायची…, मायेले बाप म्हणलो, बापाले माय म्हणालो…, बाप शिवाराचा धनी, माय शिवाराची राणी…, बाप बाभळीचा काटा ऊन पिऊन जगतो, माय पारंब्या पारंब्या पसारा भुईत.., अशा अनेक भावस्पर्शी ओळींमधून आईचे कष्ट, त्याग आणि निस्सीम प्रेम यांचे जिवंत चित्रण करत कवी प्रशांत मोरे यांनी उपस्थितांना भावनिक केले. या काव्यसादरीकरणाद्वारे मातृत्वाची ताकद आणि संस्कारांची भूमिका अधोरेखित करत लेकराच्या जडणघडणीत आईचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला.

‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत आयोजित या समारोपीय कार्यक्रमाने नागरिकांना छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जाणीव करून दिली.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात उपयोगी – विठ्ठल काळभोर
next post
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार; प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत

You may also like

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच हुंकार –...

March 15, 2025

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

२३ फेब्रुवारीला शहरातील पाणीपुरवठा बंद; निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर...

February 20, 2026

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा क्रूर चेहरा! उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू...

April 3, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

८ मजली इमारतीला लागली आग, काही...

April 17, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसिटीपासून मेडीसिटीपर्यंतचा धमाकेदार बदल –...

May 2, 2025

चिखलीतील रस्त्याच्या डांबरीकरणाने घेतला वेग! यश...

October 16, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here