• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप यांच्या तारांकित प्रश्नानंतर सरकार गंभीर – मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप यांच्या तारांकित प्रश्नानंतर सरकार गंभीर – मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

by gauravsalunkhe00@gmail.com December 10, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
76

पिंपरी चिंचवड – पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या लिफ्ट अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारला तातडीने लक्ष घालावे लागले आहे. भोसरीतील चोवीसावाडी येथे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या १२ वर्षीय अमेय फडतरेच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण शहर हादरले. या घटनेनंतर आमदार शंकर जगताप यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्याला जोरदारपणे उपस्थित केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने लिफ्ट ऑडिट विकेंद्रीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, पुणे जिल्ह्यातील सर्व लिफ्टची तांत्रिक तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ६१,५२१ लिफ्ट असून, जुलै–नोव्हेंबर २०२५ दरम्यान ५,६९४ लिफ्टची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासण्या जलदगतीने सुरू आहेत. तपासणीला गती देण्यासाठी लिफ्ट ऑडिट विकेंद्रीकरण करून ७१ पदांच्या तुलनेत तब्बल ५१९ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे सर्व लिफ्टची नियमित व काटेकोर तपासणी आता अधिक वेगाने होणार आहे.

चोवीसावाडी दुर्घटनेबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी घटनेची चौकशी करण्यात आली. अपघातानंतर संबंधित लिफ्ट तात्काळ बंद करण्यात आली असून, निरीक्षकांनी ८ ऑक्टोबर रोजी सोसायटीला दुरुस्तीची नोटीस दिली आहे. सर्व त्रुटी दुरुस्त झाल्याशिवाय आणि लेखी परवानगी मिळाल्याशिवाय लिफ्ट सुरू करण्यास मनाई असल्याचेही नोटिशीत नमूद आहे.

तारांकित प्रश्नाद्वारे आमदार जगताप यांनी लिफ्टसंबंधी सखोल मागण्या मांडल्या –
• सर्व सोसायट्यांतील लिफ्टचे प्रमाणित तांत्रिक ऑडिट
• निकृष्ट आणि अप्रमाणित लिफ्ट त्वरित बंद करणे
• नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डर्स व अधिकाऱ्यांवर कारवाई
• प्रत्येक इमारतीत प्रशिक्षित लिफ्टमनची सक्ती
• लिफ्ट सुरक्षिततेबाबत नागरिक जनजागृती मोहीम
• पिंपरी-चिंचवडमधील सर्व लिफ्टचे सुरक्षा ऑडिट तातडीने पूर्ण करणे

या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका मांडत लिफ्ट ऑडिट विकेंद्रीकरण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. यातून गृहप्रकल्पांतील लिफ्टची तपासणी अधिक काटेकोर होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळेल, असे त्यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “लिफ्टची नियमित तपासणी न झाल्यामुळे वारंवार अपघात होतात आणि निरपराध नागरिकांचे प्राण जातात. जबाबदारांनी दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकार हालचाल करण्यास मजबूर झाले आणि शेवटी जिल्हास्तरावर लिफ्ट ऑडिट विकेंद्रीकरण मंजूर झाले.

या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमधील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसह आगामी काळात अधिक कडक उपाययोजना लागू होतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. “सर्वसामान्यांच्या जीविताला प्राधान्य देणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडला 54 पदांना मंजुरी: न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होणार — आमदार शंकर जगताप
next post
राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची विशेष तपासणी मोहिम जाहीर

You may also like

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”

February 22, 2025

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व...

January 7, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे...

April 12, 2026

पिंपरीत भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार...

January 7, 2026

“शासनाची ऐतिहासिक मंजुरी: आमदार निधीतून गृहनिर्माण सोसायट्यांना पायाभूत...

March 6, 2025

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्समधील...

February 21, 2025

“आमदार अमित गोरखे वाढदिवस सोहळा ठरला समाजसेवेचा उत्सव;...

November 6, 2025

‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध

January 12, 2026

दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा

October 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस –...

March 7, 2025

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर...

February 25, 2025

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! मुळशी धरणातून पाणी...

March 3, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here