पिंपरी चिंचवड
पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली असून, येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ मधून सर्वप्रथम चारही नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास भाजपाचे शहराध्यक्ष व उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.
या प्रभागातून भाजपाकडून इच्छुक असलेल्या १२ उमेदवारांमध्ये कोणताही मतभेद नसून, ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळेल त्यांचे काम संपूर्ण ‘भाजपा परिवार’ एकजुटीने करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महापालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर–रहाटणी) येथे भाजपाच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. ग्रामदैवत श्री मुंजोबा मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर नतमस्तक होत प्रचाराचा शंखनाद करण्यात आला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता
प्रभागातील फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन, गोविंद गार्डन यांसारख्या प्रमुख वस्ती भागांमध्ये शत्रुघ्न काटे यांच्या विकासकामांची सकारात्मक दखल घेतली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरात अनेक मूलभूत व भरीव विकासकामे पूर्ण झाली आहेत.एक कार्यक्षम, नागरिकाभिमुख आणि विकासाभिमुख नेता म्हणून शत्रुघ्न काटे यांची ओळख निर्माण झाली असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली.

