• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार; प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार; प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत

by gauravsalunkhe00@gmail.com February 22, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
29

पिंपरी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे,आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे, यांच्या उपस्थितीत सात मावळे संवर्धन संस्थेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष पाहणी करताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा तसेच इतर घातक घटकांची त्यांनी पाहणी करून नदीच्या प्रदूषणामागील संभाव्य कारणांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणीनंतर महापौर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि पर्यावरणास हानिकारक घटक यांस जबाबदार असलेल्या संबंधित कंपन्या तसेच इतर संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याशिवाय या स्वच्छता अभियानामुळे नदी संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून भविष्यात अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या उपक्रमात सात मावळे संवर्धन संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमांना भविष्यात अधिक गती तसेच प्रोत्साहन दिले जाईल असे देखील महापौर लांडगे यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम
next post
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक

You may also like

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

“पुण्यात ‘टेक्नोव्हेट २०२५’ ने गाजवलं – तंत्रज्ञान आणि...

April 12, 2025

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून...

April 14, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

फसव्या लिंकवर क्लिक आणि बँक खातं रिकामे” !...

May 5, 2025

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

March 10, 2026

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो – डॉ. मोहन...

December 18, 2024

“फक्त ५०० रुपये? लाडकी बहिणींच्या पदरात निराशा; सरकारच्या...

April 15, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश...

December 23, 2025

आरोग्यासाठी मोठा उठाव! पिंपरीत ‘रन फॉर...

March 16, 2025

“सामाजिक एकतेचा अनोखा उत्सव: शरद पवार...

December 14, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here