• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात उभारणार ‘नाना पाटेकर नाट्यगृह’?
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात उभारणार ‘नाना पाटेकर नाट्यगृह’?

by gauravsalunkhe00@gmail.com October 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
20

– कला – सांस्कृतिक केंद्रासाठी आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

– जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रशासनाला सूचना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मोशी–चऱ्होली–चिखली या वेगाने विकसित होणाऱ्या निवासी पट्ट्यात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि विस्तार झपाट्याने वाढत असताना मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त सभागृहाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या धर्तीवर शहरात मोठ्या आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला ठोस प्रकल्पाचे स्वरूप देऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे.

मोशी, चऱ्होली आणि चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत असून नागरिकांची वस्ती वाढत आहे. या भागातील नागरिक, कलाकार, नाट्यसंस्था, शाळा आणि महाविद्यालयांना नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, साहित्य संमेलने, व्याख्याने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.

नाना पाटेकर यांच्या कार्याचा सन्मान…

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि सामाजिक क्षेत्रातील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून प्रस्तावित केंद्राला ‘नाना पाटेकर नाट्यगृह व सांस्कृतिक केंद्र’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आधुनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर…

प्रस्तावित प्रकल्पात प्रशस्त रंगमंच, दर्जेदार ध्वनी व प्रकाशयोजना, कलाकारांसाठी स्वतंत्र कक्ष, सरावासाठी जागा, लघु कार्यक्रमांसाठी सभागृह, दिव्यांगसुलभ प्रवेशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा सुविधांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरेसे वाहनतळ, सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थापन यांचा जागा निश्चित करतानाच विचार करावा, असेही लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे. संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जागा निश्चिती आणि प्रकल्प अहवालाची कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. याबाबत सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराची ओळख केवळ औद्योगिक नगरी म्हणून मर्यादित न राहता, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही निर्माण व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. मोशी–चऱ्होली–चिखली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेता, येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज भव्य नाट्यगृह उभारणे आवश्यक आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने हे नाट्यगृह उभारल्यास त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा सन्मान होईल. त्याचबरोबर नवोदित कलाकार, स्थानिक नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंतांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा प्रकल्प केवळ वास्तू उभारण्यापुरता मर्यादित न राहता, शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा आणि पुढील पिढ्यांना कलेशी जोडणारा उपक्रम ठरावा, अशी आमची भूमिका आहे.”

— महेश लांडगे,
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महापालिका मुख्यालयात दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र
next post
पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार शंकर जगताप

You may also like

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली...

August 6, 2026

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य...

July 2, 2025

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे...

April 12, 2026

सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली...

January 2, 2026

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि...

March 13, 2025

“शाहू वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा..”

October 16, 2026

कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

March 20, 2026

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत –...

March 11, 2026

“छत्रपती शिवाजी महाराज चौक साक्षीदार! संदीप वाघेरे–डब्बू आसवानी...

December 23, 2025

विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’

September 16, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 821 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 791 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

इंजीनियरिंग क्लस्टर येथे महिलांसाठी मोफत “इंडस्ट्रियल...

September 25, 2026

“”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती,...

March 26, 2025

संभाजीनगरात सिद्धिविनायक मंदिरात भव्य कीर्तन महोत्सवाचे...

January 15, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here