• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणे

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
56

उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी

पिंपरी, पुणे,(दि. ११ मार्च २०२६) आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.

बुधवारी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड,
माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले की, उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करून द्यावा अशी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी आहे.

सचिव जयंत कड यांनी सांगितले की, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे. त्यामुळे गॅस व इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे आखाती देशातून येणारे इंधन होय. या इंधनात भारतात येणारा गॅस, सध्या भारतात येणारा गॅस अनिश्चित स्वरूपात येत आहे. त्यामुळे गॅस दर वाढणे चालू झालेले आहे. तसेच औद्योगिक कारणांसाठी लागणारा गॅस पुरवठा अनेक ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी बंद झालेला आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

संचालक संजय सातव म्हणाले की, शासनाने तर सध्या औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा पूर्णता थांबविला आहे. कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे इंधन गॅस स्वरूपात वापरले जातात. फॅब्रिकेशन, पावडर कोटींग, सीडी कोटींगसाठी एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील जवळपास ७ ते ८ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.

या कारणांमुळे औद्योगिक उत्पादनावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. उद्योजक हे आपले उत्पादन वेळेवर तयार करू शकत नाहीत. उत्पादन खर्चात वाढ होत आहे, आपली ऑर्डर वेळेत देऊ शकत नाहीत. त्याचा परिणामाने लघुउद्योजकांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण व रांजणगाव औद्योगिक परिसरातील बरेचसे लघु उद्योजक हे बजाज, महिंद्रा, थरमॅक्स व इतर मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांवर अवलंबून आहेत. हे लघु उद्योजक जाचक जीएसटी, नोटाबंदी, महागाई, कोरोना काळातील लॉक डाऊन, बँकेचे कर्ज, थकलेले हप्ते यातून अजून सावरलेले नाहीत.

आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे – महापौर रवि लांडगे
next post
पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोठा निर्णय

You may also like

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना...

March 5, 2025

Phoenix Metro News(कर)साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू...

March 13, 2025

एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ फुलणारच!” 🔥

December 21, 2025

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय; ‘हा जनतेच्या विश्वासाचा...

January 3, 2026

भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी...

April 16, 2026

“पिंपरीच्या इंजिनीअर आईने बनवला जगातील पहिला AI स्मार्ट...

April 16, 2025

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपविरोधात श्रमिक एकता महासंघाचा उद्रेक;...

December 27, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवड...

January 18, 2025

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण...

June 3, 2025

एनईपी २०२५ मुळे लाखो नोकर्‍या उपलब्ध...

April 1, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here