• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे मत
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे मत

by gauravsalunkhe00@gmail.com April 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
56

महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजव्यवस्थेचा परिसंवादातून उहापोह

पिंपरी, दि. १२ एप्रिल २०२६ : समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा विचार समाजात रुजविण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, जातिभेद व अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणे आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या त्यांच्या कार्यातून समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पाया घातला.

महात्मा फु्ले यांचे विचार आजही समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शक असल्याचे मत ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्याचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, अॅड. मनीषा महाजन, संविधान अभ्यासक नुरखा पठाण तसेच सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील अॅड. दिशा वाडेकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुजाता बोराटे, अर्चना सस्ते, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, बाबा त्रिभुवन, माजी नगरसदस्य मारुती भापकर तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, “महात्मा फुले यांनी समाजात समता आणि शिक्षणाचा जो दीप प्रज्वलित केला, तो आजही मार्गदर्शक ठरत आहे. फुले यांच्या विचारांचा प्रसार करून समाज अधिक संवेदनशील आणि जागरूक बनविणे गरजेचे असून यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.’

अॅड. गोरक्ष लोखंडे म्हणाले, ‘महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण, जागरूकता आणि संघटित प्रयत्नांमधूनच सामाजिक परिवर्तन साध्य होऊ शकते. महिलांना शिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिल्यास समाज अधिक सक्षम होईल. तसेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.’

अॅड. मनीषा महाजन म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांनी मांडलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची आज अधिक गरज आहे. अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि परंपरांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विचारप्रबोधन घडवून समाज अधिक जागरूक आणि सक्षम बनविता येतो.’

नुरखा पठाण म्हणाले, ‘महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेत असताना समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.’

अॅड. दिशा वाडेकर म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांच्या विचारांनुसार समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करताना महिलांचे प्रश्न आणि वंचित घटकांच्या हक्कांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

क्रांतिसूर्याला सलाम या गीतगायनातूनआणि ‘जोतिबांची सावली…सावित्री माऊली’ नाटकातून इतिहासाचा जागर

सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ मध्ये पहिल्या दिवशी (११ एप्रिल) सायंकाळच्या सत्रात ‘क्रांतिसूर्याला सलाम’ या प्रबोधनात्मक गीतगायन कार्यक्रमात कव्वाल फैजान ताज यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा सुरेल आविष्कार घडविला. सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, अमरावती प्रस्तुत दोन अंकी ऐतिहासिक नाटक ‘जोतिबांची सावली…सावित्री माऊली…’ याचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. अपूर्वा सोनार आणि सहकाऱ्यांनी साकारलेल्या या नाटकातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा, संघर्षाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचा जिवंत पट उलगडण्यात आला. नाटकातील प्रभावी संवाद, सशक्त अभिनय आणि आशयपूर्ण मांडणीमुळे प्रेक्षक भावूक झाले. या दोन्ही कार्यक्रमांमधून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होऊन समाजात प्रबोधनाचा संदेश पोहोचला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद
next post
“‘आशादीप’ विझला; स्वरांचा सूर्य अनंतात विलीन — आमदार अमित गोरखे, संस्थापक अध्यक्ष कलारंग संस्था यांचे भावपूर्ण उद्गार”

You may also like

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के तर...

August 21, 2026

आरोग्यासाठी मोठा उठाव! पिंपरीत ‘रन फॉर क्युअर’ मॅरेथॉन...

March 16, 2025

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर...

May 15, 2025

“छत्रपती शिवाजी महाराज चौक साक्षीदार! संदीप वाघेरे–डब्बू आसवानी...

December 23, 2025

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक...

April 17, 2025

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित...

January 7, 2026

३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण; दगडूशेठ गणपतीचा...

September 2, 2025

सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली...

January 2, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड...

March 2, 2026

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले...

February 22, 2025

“युवोत्सव २०२५: पुण्यातील सर्वात मोठ्या क्रीडा...

March 2, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here