• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणे

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com April 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
22

महावितरणच्या चार कार्यालयांचे विभाजन करण्याची आमदार शंकर जगताप यांची मागणी

ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेऊन अतिउच्च दाब सब-स्टेशन उभारण्याच्या सूचना

ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत बैठक; प्रलंबित कामे व निधीबाबत सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी, १७ एप्रिल (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड  शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करावे, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केली.दरम्यान ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च दाब सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्याबाबत देखील सूचनादेखील आमदार जगताप यांनी केल्या आहेत.

ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी शहरातील वीज पुरवठ्यातील त्रुटी, प्रलंबित प्रकल्प आणि निधीच्या कमतरतेबाबत शासनाचे लक्ष वेधले.  यावेळी पुणे शहराच्या महापौर मंजुश्री नागपुरे, आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवड, विशेषतः रावेत, हिंजवडी आणि काळेवाडी या भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे साहजिकच वीज ग्राहकांची संख्याही लाखांच्या घरात गेली आहे. सध्याची कार्यालये ही जुन्या ग्राहकसंख्येनुसार बनवलेली असल्याने एकाच यंत्रणेवर मर्यादित मनुष्यबळात हजारो ग्राहकांचा भार येत आहे.  देहूरोड कार्यालयांतर्गत रावेतचा मोठा भाग येतो. अंतर जास्त असल्याने तक्रार निवारणासाठी वेळ लागतो.कार्यालयाचे विभाजन झाल्यास प्रत्येक कार्यालयाकडे मर्यादित क्षेत्र असेल, ज्यामुळे कागदपत्रांची कामे, नवीन कनेक्शन आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने होतील.कार्यालय जवळ आणि स्वतंत्र असल्यास ‘रिस्पॉन्स टाइम’ कमी होतो.हिंजवडी आणि काळेवाडी सारख्या दाट वस्तीच्या भागात तातडीने मदत मिळणे यामुळे सोपे होईल. त्यामुळे देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करण्याची गरज आमदार जगताप यांनी विशद केली.

विद्युत वितरण नियंत्रण समिती’ गठीत करा

मतदारसंघ निहाय ‘विद्युत वितरण नियंत्रण समिती’ गठीत करण्याबाबत आमदार जगताप यांनी विचारणा केली. त्यावर महावितरणचे मुख्य अभियंता श्री काकडे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या समितीमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, नगरसेवक आणि अशासकीय सदस्य व वीज ग्राहक प्रतिनिधी यांचा समन्वय राहणार असल्याने स्थानिक पातळीवरील तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यास मदत होईल, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.

*पायाभूत सुविधा आणि सब-स्टेशनची कामे मार्गी लागणार*

या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी ताथवडे येथील ‘यशोदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च दाब सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्याबाबत विचारणा केली; यावर महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी १९ कोटी रुपये भरून आगामी पाच महिन्यांत निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी एनसीएल पाषाण ते औंध दरम्यान नवीन उच्च क्षमतेची वाहिनी टाकणे, रहाटणी व चिंचवड सब-स्टेशनमध्ये अतिरिक्त रोहित्र बसवणे आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी आयटी पार्क परिसरातील विजेची घटलेली क्षमता पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय, जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी ) महावितरणसाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यावर भर देत, ‘पीएम सूर्य घर’ योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्यासह आरडीएसएस  व एनपीएसएस  अंतर्गत प्रलंबित असलेले प्रस्ताव पावसाळ्यापूर्वी मंजूर करून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.  यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका रहिवासी, औद्योगिक क्षेत्राला लाभ होणार आहे.

“रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडी यांसारख्या भागांत ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी कार्यालयांचे विभाजन होणे अनिवार्य आहे. केवळ कार्यालयेच नव्हे, तर सब-स्टेशनची क्षमता वाढवणे आणि नवीन फीडर बसवणे यावरही आमचा भर आहे. तांत्रिक कारणांमुळे शहरातील वीज वितरण विषयक कामे प्रलंबित राहू नये यासाठी या सर्व मागण्यांचा पाठपुरावा ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे केला असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

— शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा)

You Might Also Like
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
  • भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी वाटप
  • रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
next post
पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी

You may also like

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा...

December 19, 2025

पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा;...

February 9, 2026

“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

March 28, 2025

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची...

December 3, 2024

चंद्रकांत पाटील यांची आमदार अमित गोरखे यांच्या घरी...

September 2, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा...

April 15, 2026

श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवड मध्ये भव्य...

January 18, 2025

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद...

March 29, 2025

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण...

March 11, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 969 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (565)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (169)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (565)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (169)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती,...

March 26, 2025

पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे...

February 10, 2026

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये...

February 25, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here