• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवडकलापुणेमनोरंजनमहाराष्ट्र

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

by gauravsalunkhe00@gmail.com August 26, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
165

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड मध्ये पुरस्कार प्रदान – भाऊसाहेब भोईर

पिंपरी, पुणे (दि.२६ ऑगस्ट २०२६) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

यावर्षीचा हा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, (दि. २९ ऑगस्ट) सायं. ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रंगणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे,
पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल आदींसह कला, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“आशा भोसले”या पुरस्काराचे स्वरूप रु. १,११,०००/- (एक लाख ११ हजार रुपये) रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सुरेल आवाजाची छाप उमटविणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल.

हा संपूर्ण सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील तमाम रसिकांनी या सांगीतिक व सांस्कृतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, यांनी केले आहे.

बुधवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते.

नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या या प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती आहे. समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.

या पुरस्काराची सुरुवातीपासूनच गौरवशाली परंपरा राहिली आहे. सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

यावर्षीच्या मानकरी श्रेया घोषाल यांच्या विषयी :– भारतीय संगीत विश्वात आपल्या सुमधुर आवाजाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या श्रेया घोषाल (जन्म: १२ मार्च १९८४) यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कोटा येथे पं. महेशचंद्र शर्मा आणि मुंबईत मुक्ता भिडे यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी झी टीव्ही वरील ‘सारेगामापा’ (चिल्ड्रेन स्पेशल) चे विजेतेपद पटकावले. ‘देवदास’ (२००२) चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गाण्यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीची यशस्वी सुरुवात झाली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आसामी, भोजपुरी आणि पंजाबी अशा २० हून अधिक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत. ‘जादू है नशा है’, ‘बरसो रे’, ‘तेरी ओर’, ‘ये इश्क हाय’, ‘दीवानी मस्तानी’ तसेच मराठीतील ‘जीव दंगला’ व ‘मेरे ढोलना’ ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

श्रेया घोषाल यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ‘देवदास’, ‘पहेली’, ‘जब वी मेट’, ‘जोगवा’ इत्यादी), ७ फिल्मफेअर पुरस्कार (आरडी बर्मन न्यू म्युझिक टॅलेंट अवॉर्डसह) आणि १० हून अधिक फिल्मफेअर साऊथ पुरस्कार. याशिवाय अमेरिकेतील ओहायो राज्याने २६ जून हा दिवस “श्रेया घोषाल डे” म्हणून घोषित केला आहे. लंडन येथील युनायटेड किंगडमच्या (लंडन) संसदेत त्यांना भारतीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी विशेष सन्मानाने गौरविले गेले आहे. भारतातील १०० प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींच्या “फोर्स सेलिब्रेटी १००” यादीत त्यांचा अनेकदा समावेश झाला आहे. झी सिने, स्क्रीन आणि अनेक राज्य शासनांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांचा विश्वविक्रम; शीर्षासनातून इतिहासाची सुवर्णनोंद
next post
फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश

You may also like

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत; राष्ट्रवादीच्या प्रमुख...

January 3, 2026

सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून...

February 5, 2026

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य...

July 2, 2025

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

पक्षांच्या पलीकडे विकासाचा अजेंडा: प्रभाग ११(क) मधून निशा...

December 31, 2025

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

भारतातील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी-चिंचवडमध्ये; डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

April 14, 2025

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर...

March 11, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले;...

March 10, 2026

‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी...

February 7, 2026

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या...

August 21, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here