• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या रक्तदान शिबिराला विक्रमी प्रतिसाद! १७५५ रक्तदात्यांचा सहभाग, दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तदानाने शिबिर ऐतिहासिक ठरले!
आरोग्यकलापिंपरी चिंचवडमनोरंजनशैक्षणिक

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या रक्तदान शिबिराला विक्रमी प्रतिसाद! १७५५ रक्तदात्यांचा सहभाग, दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तदानाने शिबिर ऐतिहासिक ठरले!

जागतिक महिला दिन २०२५ | रक्तदानाचे महत्त्व | पिंपरी चिंचवडमध्ये भव्य रक्तदान आयोजन | महिलांसाठी मोफत हिमोग्राम तपासणी | समाजसेवेचा नवा आदर्श!चिंचवडमधील सर्वात मोठे रक्तदान अभियान | समाजसेवेचा नवा आदर्श!

by gauravsalunkhe00@gmail.com March 9, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
588

पिंपरी | प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने चिंचवड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १,७५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा महान संदेश दिला. विशेष म्हणजे ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’सारख्या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्तदात्याने देखील रक्तदान केले, ज्यामुळे या शिबिराचे महत्त्व अधिक वाढले. व रक्तदानाचे महत्व समजले.

एकाच वेळी दोन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

या शिबिराचे आयोजन रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कूल आणि संघवी केशरी महाविद्यालय व रसिकलाल एम. धारिवाल फार्मसी कॉलेज येथे करण्यात आले होते. १७ नामांकित रक्तपेढ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला आणि रक्त संकलन करण्यात मोठी भूमिका बजावली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शांतीलाल कटारिया, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, सचिव अ‍ॅड. राजेंद्रकुमार मुथा, खजिनदार प्रकाश चोपडा, संयुक्त सचिव प्रा. अनिलकुमार कांकरिया, राजेशकुमार साकला, विश्वस्त सतीश चोपडा, प्रवीण लुंकड, वालचंद संचेती, प्रकाश बंब तसेच रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. मुजुमदार, रक्ताचे नाते संस्थेचे राम बांगड, पालक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक अनोखी संकल्पना!

या शिबिरात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांची मोफत हिमोग्राम तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन पातळीविषयी मार्गदर्शन देण्यात आले. आरोग्य जागृतीसाठी विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन सत्र आयोजित केले, ज्यामध्ये महिला सशक्तीकरण आणि आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने वाढवली रक्तदानाची जागरूकता!

रक्तदान ही समाजसेवेतील सर्वोत्तम देणगी आहे, हा संदेश पोहोचवण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून लोकांमध्ये जनजागृती केली. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.

रक्तदात्यांसाठी विशेष भेटवस्तू!

या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन श्री जैन विद्या प्रसारक मंडळ आणि श्री शांतीलाल कटारिया – आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रक्तदात्यांना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ – सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा उज्ज्वल वारसा!

सन १९२७ पासून श्री जैन विद्या प्रसारक मंडळाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. समाजहितासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेच्या प्रयत्नांमुळे रक्तदान चळवळीला नवीन प्रेरणा मिळाली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रक्तदानासह महिलांच्या आरोग्य जागृतीचा संदेश देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

हे ही वाचा
https://phoenixmetronews.in/?p=2785

 

रक्तदान करा – जीवन वाचवा!

रक्तदान हे केवळ समाजसेवा नाही तर मानवी जीवन वाचवण्याचा एक पवित्र हेतू आहे. अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन समाजाच्या हितासाठी योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी: सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकावर, गुंतवणूकदारांना मोठा फायदा!
next post
महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे – न्यायाधीश अमृत बिराजदार

You may also like

“पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसिटीपासून मेडीसिटीपर्यंतचा धमाकेदार बदल – भाजपाचे आमदार...

May 2, 2025

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार...

April 17, 2026

“अचूक हवामान अंदाजासाठी एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडारची स्थापना”

December 5, 2024

“९,६७५ कोटींचा भव्य अर्थसंकल्प! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या...

February 21, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

March 20, 2026

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

February 23, 2025

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ....

January 15, 2025

“मोठी घोषणा: अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार...

April 18, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख...

March 4, 2025

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १००...

February 28, 2025

🔴 जनसंवाद दौऱ्यातून विश्वासाचा सेतू; विजयनगर-काळेवाडीत...

December 24, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here