• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग
पिंपरी चिंचवडकलापुणेमनोरंजनमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग

by gauravsalunkhe00@gmail.com February 27, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
82

चित्रपट प्रेमींना सर्व चित्रपट पूर्णपणे विनामूल्य पाहण्याची सुवर्णसंधी

पिंपरी, दि. २७ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था, पुणे (एफटीआयआय) यांच्या सहकार्याने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येत असलेला हा महोत्सव एक भव्य, वैविध्यपूर्ण आणि आशयघन सांस्कृतिक सोहळा ठरणार असून यंदाच्या महोत्सवात तब्बल ४३ देशांमधील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद शहरातील चित्रपटप्रेमींना या महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार असून हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.

महोत्सवात भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, सायप्रस, इटली, ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, लेबनॉन, पॅलेस्टाईन, चिली, ब्राझील, जपान, थायलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस आदी देशांचा सहभाग आहे. विविध खंडांतील देशांमधून आलेल्या चित्रपटांमुळे महोत्सवाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

या महोत्सवात लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक चित्रपटातून समाजमनाला स्पर्श करणारे आणि विचारप्रवर्तक विषय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.

महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांमधून विज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रेम व मानवी भावना, महापूर व आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे विविध विषय मांडण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण व लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृती संवर्धन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदल जनजागृती आणि कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा सकारात्मक व समाजाभिमुख विषयांचाही देखील समावेश आहे.

चित्रपट क्षेत्रात महिलांना अधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्याचा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे. याशिवाय, ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा शहराच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारा आणि नव्या विचारांना चालना देणारा उपक्रम ठरणार आहे.

*५ मार्च रोजी संपन्न होणार पारितोषिक वितरण समारंभ*
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ अंतर्गत बुधवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धा विभागांतील उत्कृष्ट चित्रपटांना सन्मानित करून पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट या विविध गटांमधील निवडक कलाकृतींना सन्मानित करण्यात येणार असून ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ या विशेष पुरस्काराचाही यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास चित्रपटसृष्टीतील मान्यवर, परीक्षक तसेच सहभागी दिग्दर्शक व निर्माते उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ मध्ये ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे. मराठी माध्यमातील शिक्षणव्यवस्था, बदलते सामाजिक वास्तव आणि स्थानिक भाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. मराठी भाषा, शिक्षण आणि सांस्कृतिक ओळख यांचा परस्परसंबंध प्रभावीपणे उलगडणारा हा चित्रपट महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार असून चित्रपटप्रेमींना मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.

‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा आपल्या शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. तब्बल ४३ देशांतील ११६ दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि मानवी मूल्यांवर आधारित आशयपूर्ण कलाकृती नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नव्या विचारांना दिशा मिळेल, तसेच विशेषतः महिला दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या विनामूल्य महोत्सवाचा लाभ घ्यावा.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून विविध देशांतील आशयघन आणि दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून सांस्कृतिक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यंदा ४३ देशांतील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि दीर्घपट अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, तंत्रज्ञान, मानवी मूल्ये आणि जागतिक शांतता अशा विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ पुरस्काराच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा.
– दत्ता गुंड, संस्थापक, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; स्वच्छ पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा”
next post
मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष!

You may also like

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

शुक्रवारी चिंचवड येथे संविधान सुरक्षा परिषद

December 12, 2024

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’...

May 27, 2025

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

उषा इंटरनॅशनल महाराष्ट्रातील पारंपारिक मार्शल आर्ट “मर्दानी खेळाला”...

December 9, 2024

“३१ मार्च आज शेवटची संधी! थकबाकीदारांची मालमत्ता कोणत्याही...

March 31, 2025

रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न

December 3, 2024

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्समधील...

February 21, 2025

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ....

January 15, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

महानगरपालिका निवडणूक २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन...

December 19, 2025

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” –...

March 3, 2025

भारतात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या...

January 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here