• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड २० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा, थकबाकीदारांनी घेतला अभय योजनेचा लाभ
पिंपरी चिंचवड

२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा, थकबाकीदारांनी घेतला अभय योजनेचा लाभ

by gauravsalunkhe00@gmail.com March 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
42

पिंपरी, दि. २० मार्च २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम तब्बल ८० कोटींहून अधिक आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ (रात्री १२ पर्यंत) सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभय योजना लागू झाल्यापासून १ मार्च २०२६ (सकाळी १० पासून) ते २० मार्च २०२६ (दुपारी १२ पर्यंत) या २० दिवसांच्या काळात तब्बल २७ हजार ८४० मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत ८० कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना १९ कोटी १५ लाखांची सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले आहे. तसेच काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नसून, अशा मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’चा लाभ घेऊन ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत मालमत्ता कर भरून विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे राहणार खुली
महानगरपालिकेने शनिवार, रविवारसह दि. २१ मार्च रोजी रमजान ईद, दि. २६ मार्च रोजी श्री राम नवमी आणि ३१ मार्च रोजी महावीर जयंती अशा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे. तसेच कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

महानगरपालिकेच्या ‘अभय योजने’ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीमुळे थकबाकीदारांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. मात्र अजूनही काही मालमत्ताधारकांकडून थकीत कराचा भरणा झालेला नाही. अशा सर्वांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत रक्कम एकरकमी भरून या योजनेचा लाभ घ्यावा. महापालिकेकडून ऑनलाइन सुविधा तसेच सर्व कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली असून, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ही केंद्रे खुली राहणार आहेत. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा
-डॉ. विजय सुर्यवंशी , आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’ला नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रशासनावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, थकीत मालमत्ता करावरील विलंब शुल्कात मोठी सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडे अद्याप थकीत मालमत्ता कर बाकी आहे, त्यांनी ३१ मार्चपूर्वी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक बचत करावी.
*-रवि लांडगे, महपौर , पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी – महापौर रवि लांडगे
next post
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

You may also like

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि...

March 13, 2025

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा....

February 25, 2026

वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडीवर निर्णायक उपाय; सात...

December 14, 2025

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा;...

March 10, 2026

प्रचार दौऱ्यात भावनिक क्षण; शरदनगरने दिला निशा यादव...

December 20, 2025

“प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे...

January 5, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

भाजपच्या ‘गुड गव्हर्नन्स’मुळेच विकास तळागाळापर्यंत पोहोचला : आमदार...

April 10, 2026

“स्थानिकांची महत्त्वपूर्ण मागणी! अटल बिहारी वाजपेयी उद्यानात गेम...

April 1, 2025

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांचा विश्वविक्रम; शीर्षासनातून...

August 25, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा...

February 24, 2025

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी...

January 5, 2026

प्रचार दौऱ्यात भावनिक क्षण; शरदनगरने दिला...

December 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here