• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत कामगिरी; पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी चर्चेत
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत कामगिरी; पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी चर्चेत

by gauravsalunkhe00@gmail.com July 21, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
277

पिंपरी, २० जुलै (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी ठोस आणि अभ्यासू भूमिका घेत विधानभवनात आपल्या मतदारसंघाचा बुलंद आवाज पोहचवला. पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसह, स्थानिक प्रश्नांवर त्यांनी प्रभावी लक्ष वेधले. विधानसभेच्या १५ पैकी १५ बैठकींना शंभर टक्के उपस्थित राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे.

पत्रकार कल्याण महामंडळाची ठाम मागणी

लक्षवेधी सूचना क्र. २४७३ अंतर्गत जगताप यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली. त्यांनी आरोग्य विमा, अपघात विमा, शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, आणि किमान वेतन या सुविधा राज्यातील सर्व पत्रकारांना मिळाव्यात, असा ठाम आग्रह धरला.

पिंपरी-चिंचवडच्या समस्या अधिवेशनात ऐरणीवर

जगताप यांनी ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडून पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या समस्या ठळकपणे मांडल्या. डीपी आराखड्यातील बेकायदेशीर रस्ते आरक्षण, हिंजवडी वाहतूक कोंडी, बनावट नोटप्रकरण, आणि PMPML वसाहतींसारखे विषय यामध्ये होते.

महत्त्वाचे मुद्दे:

मुळा नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात कारवाई

धर्मादाय रुग्णालयातील सवलतींचा ऑनलाईन अंमलबजावणी

शिक्षण विभागातील वेतन घोटाळ्यावर S.I.T. चौकशीची मागणी

झोपडपट्टी पुनर्विकास विधेयकावर नियमबाह्य TDR विरोधात भूमिका

गोवंश हत्येवर कठोर कारवाईसाठी औचित्याचा मुद्दा

विधेयकांवर अभ्यासपूर्ण चर्चा

जगताप यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणा विधेयकावर बोलताना, कोयता गँग, अन्न भेसळ करणारे, अमलीपदार्थ विक्रेते यांना MCOCA अंतर्गत आणण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

मुख्यमंत्र्यांसोबत थेट चर्चा

हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश, पूरस्थिती, अतिक्रमण, वाहतूक कोंडी यासारख्या विषयांवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली.

शाश्वत विकासासाठी ठाम पावले

पवना, मुळा, इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेवर भर

डिजिटल शिक्षणासाठी नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची मागणी

शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना

सायबर लॅब्स, हेल्पलाइनसह गुन्हेगारी नियंत्रणासाठी उपाय

लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श उदाहरण

स्थानिक प्रश्न असो वा राज्यस्तरीय धोरणे – आमदार शंकर जगताप यांची उपस्थिती ही केवळ संख्यात्मक नव्हे, तर विषयाचे गांभीर्य ओळखणारी आणि ठोस कृती करणारी आहे. त्यांनी पत्रकार, विद्यार्थी, महिला, कामगार, शिक्षक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी अधिवेशनात अभ्यासपूर्वक मांडल्या.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी
next post
” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस झाला समाजासाठी संकल्प – वृक्षारोपण, रक्तदान आणि रोजगार!”

You may also like

विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज...

December 22, 2024

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ –...

July 12, 2025

“नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि चार सरपंच थेट रंगमंचावर...

March 2, 2025

पक्षांच्या पलीकडे विकासाचा अजेंडा: प्रभाग ११(क) मधून निशा...

December 31, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या –...

March 14, 2026

🔴 राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...

January 3, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“शब्दांना कृतीची जोड! आमदार शंकर जगताप...

June 3, 2025

🚨 सरकारी नोकरी 2025: 1 लाख+...

March 25, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची...

March 2, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here