• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home तंत्रज्ञान बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर
तंत्रज्ञानपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

by gauravsalunkhe00@gmail.com February 25, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
49

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयक विशेष व्याख्यान

पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : “पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन प्रक्रिया एआयमुळे अधिक वेगवान झाली आहे. मात्र, एआयचा वापर करताना संबंधित वाचकवर्ग लक्षात घेऊन योग्य प्रॉम्प्ट तयार करणे आणि प्राप्त माहितीची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत पत्रकारांनी एआयचा प्रभावी वापर केल्यास त्यांची बातमी अधिक नेमकी, विश्वसनीय आणि वेगळी ठरू शकते,” असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विशेष उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या व्याख्यानादरम्यान विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, अविनाश चिलेकर, नंदकुमार सातुर्डेकर हे विचारपीठावर उपस्थित होते.

प्रा. पाटणकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता क्षेत्र अधिक सक्षम व प्रगल्भ होणार असल्याचे नमूद केले. बातम्या अधिक माहितीपूर्ण व परिपूर्ण करण्यासाठी एआय उपयुक्त ठरत असून, या तंत्रज्ञानामुळे पत्रकारांच्या नोकऱ्यांवर धोका निर्माण झाला नसून त्यांच्या कामकाजात सुलभता निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी त्यासंबंधित तंत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या मार्गदर्शन सत्रामध्ये एआय म्हणजे काय, ते कसे कार्य करते, एआयचे विविध प्रकार, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) यांची संकल्पना, तसेच प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याची पद्धत याविषयी त्यांनी उदाहरणांसह सविस्तर माहिती त्यांनी दिली.

एआय प्रणालींमध्ये डेटा सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, बातमी तयार करण्यासाठी लागणारा वेळ या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलित करणे, तिचे विश्लेषण करणे आणि संशोधन करणे ही प्रक्रिया एआयच्या साहाय्याने अधिक वेगवान व सुलभ झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, एआयकडून माहिती घेताना संबंधित बातमी कोणत्या वाचकवर्गासाठी आहे, हे निश्चित करून त्यानुसार प्रॉम्प्ट तयार करणे आवश्यक आहे. तसेच एआयद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करणे गरजेचे असून, त्यासाठी पत्रकारांचा अनुभव व सखोल वाचन उपयुक्त ठरते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर म्हणाले, “महानगरपालिकेने एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे निश्चितच कौतुकास्पद आहे. आज एआयमुळे बातमी लेखनासाठी आवश्यक संदर्भ, माहिती आणि पार्श्वभूमी सहज उपलब्ध होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा नेमका आणि जबाबदारीने वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात.

पत्रकारिता ही काळानुसार सातत्याने बदलत आलेली आहे. हाताने पाने जुळवण्यापासून ते संगणकाधारित संपादनापर्यंत आपण अनेक तांत्रिक टप्पे अनुभवले आहेत. विज्ञानाच्या प्रगतीसोबत पत्रकारितेतही बदल अपरिहार्य ठरले आहेत. आजच्या डिजिटल युगात एआयचा वापर हा बदलत्या काळाची गरज बनला आहे. अशा पार्श्वभूमीवर एआयविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित करणे ही प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी महत्त्वाची आणि स्वागतार्ह बाब आहे, असे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकारांसाठी व्याख्यान आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. प्रसार माध्यमांमध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असते. ही विश्वासार्हता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे देखील ते म्हणाले. तसेच व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार त्यांनी मानले.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये दणदणीत विजय
next post
नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात सुरुवात

You may also like

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १०० दिवसांच्या कृती...

February 28, 2025

डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान

December 14, 2024

वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा करा— महापौर...

March 2, 2026

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

January 17, 2026

“भोसरीत रस्त्यांचा विकास वेगात! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 22, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा...

January 12, 2026

युवा सक्षम तर देश सक्षम! टेडेक्स पीसीसीओईआरमध्ये आमदार...

February 26, 2025

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

February 5, 2025

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 973 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 766 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 760 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 730 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर...

December 18, 2024

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

December 22, 2024

भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची...

December 4, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here