• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पुणे मराठी भाषा गौरव दिनाच्या खर्चास मान्यता; स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना हिरवा कंदील
पुणेपिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिनाच्या खर्चास मान्यता; स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना हिरवा कंदील

by gauravsalunkhe00@gmail.com March 4, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
149

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसह शहर प्रदूषणमुक्तीवर भर :-स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘इन्कम जनरेशन’ आणि ‘प्रदूषण नियंत्रण’ या दोन सूत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसचिव मुकेश कोळप , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. स्थायी समिती सभापती दालनात प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर भूमिका मांडताना ते बोलत होते.
बैठकीत मनपाच्या मुख्य लेखा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रजा मंजुरी कामी सादर केलेल्या विनंती अर्जाला मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिना”निमित्त दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी यामध्ये कलाकार, वक्ते मानधन, सांस्कृतिक कार्यक्रम असा एकूण खर्च र. रु. ७,५०,०००/- (अक्षरी र.रु. सात लाख पन्नास हजार फक्त) इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

प्रदूषणमुक्तीसाठी ‘ॲक्शन प्लॅन’
शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत सभापती अभिषेक बारणे यांनी कडक पावले उचलली आहेत. “शहरात धुळीचे प्रमाण वाढू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम सुरक्षा (Safety) तपासण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील मोठ्या कामांची प्रगती आणि सुरक्षिततेची नियमित देखरेख करावी,” असे निर्देश सभापती बारणे यांनी बैठकीत दिले.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर लक्ष; कर्जमुक्तीकडे वाटचाल

महापालिकेच्या आर्थिक नियोजनाबाबत बोलताना अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, सध्या पालिकेवर दायित्व (Liability) अधिक आहे. “नवीन कामांपेक्षा आधीचे प्रकल्प पूर्ण करणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवणे हे आमचे प्राधान्य आहे. वाकडसह उपनगरांतील कर संकलन वाढवणे आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून महसुलात भर टाकणे यावर आम्ही भर देत आहोत. निधी वाढल्यास शहराच्या वैभवात भर घालणारी कामे वेगाने होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महापालिकेवर असलेले कर्ज कमी करून शहर कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खर्चात कपात आणि पारदर्शक कारभार

पदाधिकाऱ्यांच्या वाहन भाड्याबाबत होणाऱ्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “चालकांची कमतरता असल्याने भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचे जुने धोरण आहे. मात्र, सव्वा लाख रुपये महिना यांसारख्या मोठ्या बिलांची आणि दरांची आम्ही पुन्हा शहानिशा करणार आहोत. इंधन, चालक आणि देखभाल यासह वाजवी दरात सेवा मिळावी, यासाठी खर्चात कपात करण्याचे आमचे धोरण आहे.” त्यानुसार पदाधिकारी स्वेच्छेनुसार त्यांना दरमहा ५० हजार रुपये खर्च देण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. तसेच, प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेऊनच बिले अदा केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या ठेवींबाबत भाष्य करताना अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “महापालिकेच्या आवश्यक ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही, या आरोपांची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल.” अत्यावश्यक नसलेली नवीन कामे तूर्तास थांबवून केवळ गरजेच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या सभेत प्रलंबित राहिलेल्या विषयांवर आणि विविध उपसूचनांवर पुढील तहकूब सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोणत्या विभागाने किती कामे केली आणि कोणती प्रलंबित ठेवली, याचा ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ही संबंधित अधिकारी यांच्याकडे मागविला असल्याचे त्यांनी सांगितले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…
next post
जगात युद्धाचे ढग, भारतात मात्र शांतता; करोडो श्रमिकाच्या वतीने कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार!

You may also like

“दुबईत घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा नारा; सचिन...

May 8, 2025

ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी...

March 5, 2026

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम...

January 20, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर जगताप यांच्या...

December 20, 2025

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रानजाई महोत्सवात सांस्कृतिक आणि पर्यावरणीय...

March 6, 2025

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये भव्य सोहळा...

February 25, 2025

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजेचे हित जपणारे रयतेचे...

February 19, 2026

श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!

March 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भोसरीत महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे...

March 25, 2025

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश...

December 23, 2025

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र...

April 18, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here