• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!

by gauravsalunkhe00@gmail.com March 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
17

– भाजपा आमदार महेश लांडगे यांची निवेदनाद्वारे मागणी
– नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या धार्मिक यात्रांसाठी आवश्यक खर्च वाढत असताना सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवण्याची मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर पत्र पाठवून आळंदी नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, आळंदी नगरपरिषदेला सध्या यात्राकराच्या स्वरूपात केवळ १.६२ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, सन २०२३–२४ या कालावधीत यात्रेसाठी नगरपरिषदेला तब्बल २.७३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. परिणामी, सुमारे १.११ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च नगरपरिषदेच्या स्वतःच्या निधीतून करावा लागला आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

याच आर्थिक तणावामुळे नगरपरिषदेची वीज देयके आणि शासकीय पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. यात्रेच्या व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था उभारावी लागते. मात्र सध्याचे अनुदान या खर्चासाठी अपुरे ठरत असल्याने नगरपरिषदेला वारंवार स्वतःच्या निधीवर ताण येत आहे.

दरम्यान, संतश्रेष्ठ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा होणार असून, या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी श्रीक्षेत्र आळंदी येथे येणार आहेत. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार लांडगे यांनी अधोरेखित केले आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनानेही यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालयाकडे अनुदान वाढीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे कामकाज सुरळीत आणि सक्षमपणे चालण्यासाठी यात्रा अनुदानात वाढ करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“श्रीक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. त्यामुळे यात्रेच्या काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना आणि सुरक्षेसाठी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवणे आवश्यक आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून, आळंदी नगरपरिषदेला सक्षमपणे काम करता यावे आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी
next post
PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’ शिक्षण प्रणालीवर शिक्षकांना मार्गदर्शन

You may also like

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले यांची मोठी...

February 22, 2025

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर...

May 15, 2025

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी; पवना...

March 14, 2026

भारतात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या अनेक संधी...

January 18, 2025

सहयोगनगर- तळवडेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारणार मोनोपोल!

December 3, 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत ८० तक्रारी –...

March 10, 2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत...

April 10, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६...

December 20, 2025

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा...

June 18, 2025

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे...

February 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here