• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’ शिक्षण प्रणालीवर शिक्षकांना मार्गदर्शन
पिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’ शिक्षण प्रणालीवर शिक्षकांना मार्गदर्शन

by gauravsalunkhe00@gmail.com March 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
51

पिंपरी, दि. ७ मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इएल माईंडस्पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने EdTech (शैक्षणिक तंत्रज्ञान) तसेच PAL – Personalised Adaptive Learning (वैयक्तिक अनुकूल शिक्षण पद्धती) या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले.

महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार तसेच शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर आणि उप आयुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, समन्वय अधिकारी सुनिता गीते तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
या प्रसंगी इएल माईंडस्पार्कतर्फे प्रकल्प व्यवस्थापक नमन कुमार आणि सहाय्यक प्रशिक्षण व्यवस्थापक रीता दाक्षिणी यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी MindSpark या PAL – Personalised Adaptive Learning सॉफ्टवेअरची माहिती देताना ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित डिजिटल शिक्षण प्रणाली असल्याचे सांगितले.

ही प्रणाली विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचा अभ्यास करून त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन देते. विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाबी ओळखून त्यानुसार प्रश्न, सराव व शैक्षणिक उपक्रम उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे विशेषतः गणित आणि इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत होते आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळते.

या मार्गदर्शन सत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच Computational Thinking (संगणकीय विचारप्रक्रिया) या संकल्पनांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे २० शाळांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी सहभागी झाले होते. याशिवाय सुमारे ४० मुख्याध्यापक आणि शिक्षक या सत्रात उपस्थित होते.

डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचा निश्चितच सकारात्मक फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक आहे. माईंडस्पार्क सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होते. महापालिकेच्या शाळांमध्ये अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळण्यास निश्चितच मदत होईल.”— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर करणे काळाची गरज आहे. PAL प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.”
— रविना अंगोळकर, शिक्षण समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!
next post
गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू

You may also like

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक...

April 17, 2025

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री...

February 6, 2026

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य...

March 4, 2026

हफ्तेखोरी ते टेंडर रिंगपर्यंत आरोपांची मालिकाच; अजित पवारांचे...

January 3, 2026

विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज...

December 22, 2024

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर...

March 11, 2026

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे संकेतस्थळ AIसोबत...

April 22, 2025

“पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेचा कहर! पुढील ४८ तासात उष्णतेची...

April 25, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 970 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी...

April 15, 2026

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात...

February 27, 2026

“2025 मध्ये भारतातील टॉप 5 हेल्थ...

March 27, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here