• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण; समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय
पिंपरी चिंचवडकलाक्रीडापुणेमनोरंजन

क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण; समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय

by gauravsalunkhe00@gmail.com March 13, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
52

पिंपरी, दि. १३ मार्च २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी समितीच्या सर्व उपक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. समितीच्या वर्षभरातील कार्यक्रमांचे आगाऊ नियोजन करून सर्व सदस्यांच्या सहमतीने हे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे झालेल्या समितीच्या बैठकीत शहरातील क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि समितीचे कामकाज अधिक सुबक पद्धतीने राबविणे यावर बैठकीत एकमत व्यक्त करण्यात आले.

बैठकीस महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा समिती सदस्य भाऊसाहेब भोईर, सदस्य जितेंद्र ननावरे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त पंकज पाटील, चेतना केरूरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील महापालिकेच्या जलतरण तलावांमधील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी क्लोरीनची पातळी नियमित तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना याची माहिती मिळावी यासाठी तलाव परिसरात सूचनाफलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले.

तसेच क्रीडा विभागाच्या सध्याच्या धोरणाचा सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या अहवालाचा अभ्यास करून आवश्यक ते बदल समिती सदस्यांच्या संमतीने करण्यात येणार आहेत. समितीच्या वर्षभराच्या कामकाजाचे आगाऊ नियोजन तयार करून त्यावर ठराव मंजूर करण्यावरही भर देण्यात आला.

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाट्यगृहांमध्ये इतर शहरांतील कलाकारांच्या छायाचित्रांऐवजी पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कलाकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे लावण्याची सूचना करण्यात आली.

याशिवाय शहरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली.

नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या प्रलंबित कामांना गती देण्यावरही विशेष भर देण्यात आला. शहरातील मुलांना खेळासाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या शाळांमधील मैदाने सुट्टीच्या दिवशी खेळण्यासाठी खुली करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची सूचनाही करण्यात आली.

१ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या कामगार दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांच्या योगदानाचा सन्मान होईल आणि शहरात सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, शहरातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षकांची संख्या वाढविण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. खेळाडूंना दुखापती झाल्यास उपचार खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी विशेष विमा योजना सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच विविध क्रीडा संकुल आणि मैदानांवर सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

बैठकीत यमुनानगर येथील माँसाहेब सौ. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव आणि मोहननगर येथील श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा ठराव स्थायी समितीसमोर सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
next post
निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी; पवना जलवाहिनीवरून सभागृहात राहुल कलाटे आक्रमक

You may also like

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५...

July 24, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण...

January 7, 2026

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

June 18, 2025

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १०० दिवसांच्या कृती...

February 28, 2025

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी...

February 21, 2025

विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय...

January 7, 2026

“पिंपरी-चिंचवडमध्ये दारु दुकानदारांचा खेळ खल्लास! 4 दुकाने कायमस्वरूपी...

April 1, 2025

पिंपरी गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे...

January 12, 2026

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा;...

March 10, 2026

पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह उत्सव 2025...

April 27, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“कचऱ्यापासून सुंदरतेची निर्मिती: भोसरीतील गुडविल चौकाची...

March 5, 2025

विकसित भारतासाठी युवा पिढीचा सहभाग आवश्यक...

January 26, 2026

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

April 25, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here