• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

by gauravsalunkhe00@gmail.com February 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
58

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शहरात शाहिरी,व्याख्यान यांसह विविध कार्यक्रम आणि शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचे आयोजन – महापौर रवि लांडगे

पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे.

या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’, ‘यशाचा नवा मंत्र – शिवमंत्र’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनावर आधारित शाहिरी पोवाडे’ यांसह शालेय विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधनपर्व साजरे करीत असते. यानिमित्त यंदाही महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महापौर रवि लांडगे यांचे हस्ते निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान येथे होणार असून अनेक मान्यवर या उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी,सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भक्ती शक्ती चौक निगडी येथील कार्यक्रम…

१५ फेब्रुवारी रोजी निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे ६ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी ७ वाजता अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव आणि आमु जाधव हे विविध वाद्यांमधून ‘शिवशंभो गर्जना’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत,तर १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता शाहीर प्रकाश ढवळे तसेच शाहीर अशोक कामथे, बाळासाहेब मालुसकर, चैतन्य काजुळकर, जालिंदर शिंदे, लीना देशपांडे, वनिता मोहिते, कांचन जोशी, प्रचिती विष्णूरकर, स्मिता बांदिवडेकर, चित्रा कुलकर्णी, उज्वला जाधव, राजरत्न पांडगळे, शाहीर घनशाम कुदळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरीच्या माध्यमातून मानवंदना देणार आहेत.

संभाजीनगर, चिंचवड येथील कार्यक्रम…

१७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता डॉ. विजय तनपुरे हे ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ हा शाहिरी कार्यक्रम सादर करणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी व्याख्याते अविनाश भारती हे ‘आदर्श राजे – छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कमलनयन बजाज शाळेजवळ हा कार्यक्रम होणार आहे.

एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील व्याख्यान…

१९ फेब्रुवारी रोजी एच. ए. कॉलनी, नेहरूनगर येथे संध्याकाळी ७ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज – एक आदर्श राजे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य बालाजी काशिद आणि दस्तगीर काझी व्याख्यान सादर करणार आहेत.

डांगे चौक, चिंचवड येथील कार्यक्रमांचा तपशील…

डांगे चौक, थेरगाव येथे १७ फेब्रुवारी रोजी शाहीर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर व सहकारी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करणार आहेत. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता व्याख्याते भरत रखमाजी पांगारे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तीमंत जीवनविद्या’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी शिवशाहीर डाॅ.विजय महाराज तनपुरे यांचा ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ हा शाहिरी कार्यक्रम सादर होणार आहे.
सदरचे कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुले व विनामूल्य असून शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे अभिमानास्पद – ज्ञानेश्वर लांडगे
next post
छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजन

You may also like

प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंसचा वाढता पाठींबा, लोकांच्या...

January 11, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई...

April 28, 2025

भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी...

April 16, 2026

शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ : नियोजनासाठी...

January 27, 2026

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय...

January 11, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपाची ताकद दिसली; गोरखे-चांदगुडे-हिंगे-कदम यांचा...

December 27, 2025

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली...

December 20, 2025

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद...

December 19, 2025

पिंपरी-चिंचवडचं नवं नाव “जिजाऊ नगर” व्हावं...

July 12, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत...

January 8, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here