• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी; पवना जलवाहिनीवरून सभागृहात राहुल कलाटे आक्रमक
पिंपरी चिंचवडराजकारण

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी; पवना जलवाहिनीवरून सभागृहात राहुल कलाटे आक्रमक

by gauravsalunkhe00@gmail.com March 14, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

पिंपरी चिंचवड (वाकड), दि. १४ मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (१३ मार्च) पार पडली. या सभेत शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. महिनाभरानंतर झालेल्या या सभेत पाणीपुरवठा संदर्भात प्रशासनाने कोणती ठोस पावले उचलली याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी करत भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे सभागृहात आक्रमक झाले.

शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे तसेच रावेत पंपिंग स्टेशनमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या भागांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्पाला तातडीने निधी देऊन कामाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे कलाटे यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

कलाटे म्हणाले की, “नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. पाण्यासाठी निधीअभावाचे कारण सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपने सत्तेत येताना पिंपरी-चिंचवडकरांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे आणि ते पूर्ण झालेच पाहिजे.”

सभेत स्मार्ट सिटी योजना, दररोजचा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधत कलाटे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारले.

रावेत पंपिंग स्टेशनमधील पाण्याचा दर्जा खालावत असल्याची चिंता

कलाटे म्हणाले की, पवना धरणातून सोडण्यात येणारे पाणी रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून उचलून शुद्ध करून संपूर्ण शहराला पुरवले जाते. मात्र रावेत पंपिंग स्टेशन परिसरातील पाण्याचा दर्जा खालावत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

या संदर्भात पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी महापालिकेने २० लाख रुपये खर्च करून नेमलेल्या संस्थेमार्फत नेमके कोणते काम केले जाणार आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच महापौरांनी यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली होती. त्या भेटीनंतर महिनाभरात कोणती ठोस कार्यवाही झाली याबाबत सभागृहाला माहिती देण्यात यावी, असेही कलाटे यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेवरही प्रश्न

स्मार्ट सिटी योजनेबाबत बोलताना कलाटे म्हणाले की, या योजनेचा आवाका समजून घेतला पाहिजे. या योजनेत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या दोन गावांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्यक्ष विकासकामे या भागांपुरतीच मर्यादित राहिली.

मात्र या योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यांसारखे काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. शहराच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे असले तरी ठेकेदाराने बसवलेले अनेक कॅमेरे सध्या कार्यरत आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून त्यांची देखभाल व दुरुस्ती करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पवना जलवाहिनी प्रकल्प १५ वर्षांपासून रखडलेला

पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पवना जलवाहिनी प्रकल्प गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुरुवातीला सुमारे ४०० कोटी रुपये असलेला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आता तब्बल १२५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तरीही हा प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याची स्थिती आहे.

लोकसंख्या वाढत असताना शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी कलाटे यांनी सभागृहात केली.

“नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने बजेटचे कारण सांगणे दुर्दैवी आहे. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्याचे भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासन दिले आहे. ते पूर्ण झालेच पाहिजे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून पवना जलवाहिनी प्रकल्पाला तातडीने गती द्यावी.”
— राहुल कलाटे, नगरसेवक (भाजप)

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण; समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय
next post
पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी

You may also like

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत –...

March 11, 2026

“शेकडोंची वाहतूक कोंडी संपली! चिखली-पाटीलनगरचा अडथळा हटवला”

May 11, 2025

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

“निगडी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन...

March 20, 2025

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘पदवीधर वेतन त्रुटी निवारण’ निर्णयामुळे...

October 15, 2025

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा;...

March 10, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका

March 21, 2026

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

February 24, 2026

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा...

February 24, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले...

April 11, 2026

🚀 पिंपरी चिंचवड शहराचा सुवर्णकाळ! ‘व्हिजन@५०’...

March 22, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here