• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या – आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com March 14, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
21

आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे कायमस्वरूपी हस्तांतर करण्याची मागणी

पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा

पिंपरी, 13 मार्च : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता वेग आला आहे. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण आणि रावेत येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे आधुनिकीकरण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आमदार शंकर जगताप यांच्याकडून केला जात आहे. यासंदर्भात भाजपा महायुती सरकार सकारात्मक असून, आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतर कायमस्वरूपी करणे आणि रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी 105 कोटी रुपयांची निधी देण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुदानाच्या मागण्यांदरम्यान केली. या माध्यमातून पाणी टंचाईवर तोडगा निघणार असून, शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, शहराला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जॅकवेल, अप्रोच चॅनेल, पंप हाऊस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहे. मुख्य अभियंता (जलसंपदा) यांनी हा प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठवला असून, या जमिनीचे मूल्यांकन व हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे आंद्रा धरणाचे पाणी थेट शहरात पोहोचवण्यातील तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी निधी द्या

दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारा रावेत येथील पवना नदीवरील बंधारा ब्रिटिशकालीन असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन दररोज सुमारे ५ कोटी लिटर पाणी वाया जाते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून जुन्या पद्धतीचा बंधारा बदलून तिथे व्हर्टिकल लिफ्ट शाफ्ट (उभी उचल पद्धत) हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधुनिक बंधाऱ्यामुळे गाळ साचण्याची समस्या दूर होईल आणि पाण्याचा अपव्यय थांबेल. या प्रकल्पासाठी १०५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्याला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे .

ठळक मुद्दे

१ मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव
२ नवीन रावेत बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा खर्च करून व्हर्टिकल लिफ्ट शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार.
३ दररोज वाया जाणारे ५ कोटी लिटर पाणी वाचणार.
४ पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी जलनियोजनावर भर.

“पिंपरी-चिंचवडकरांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये. यासाठी आंद्रा धरण प्रकल्प आणि रावेतचा नवीन बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही कामांना गती मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, पाणी टंचाईवर तोडगा काढून पाणीपुरवठ्याचे नियोजन मार्गी लावणे हे आमचे प्राधान्य आहे.”

–शंकर जगताप

आमदार, पिंपरी चिंचवड शहर

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी
next post
गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप

You may also like

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

मकरंद निकम निवृत्तीनंतर महापालिकेत कार्यभार वाटप; ओंभासे, सेठिया,...

March 5, 2026

“योगिनी महिला बचत गटाचा भव्य शुभारंभ – महिलांसाठी...

February 24, 2025

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

काळभोरनगरमध्ये मा.नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने ‘छावा’चा भव्य...

March 17, 2025

माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो – डॉ. मोहन...

December 18, 2024

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

पिंपरी–चिंचवडला झेप घेण्यासाठीचा “संकल्पनामा”! – आमदार शंकर जगताप

January 13, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“कर्तव्यपथाचे ३६५ दिवस” : आमदार अमित...

December 14, 2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर...

April 10, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून...

April 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here