• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा महापौरांनी घेतला आढावा; वेळेत व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश
पिंपरी चिंचवड

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा महापौरांनी घेतला आढावा; वेळेत व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश

by gauravsalunkhe00@gmail.com March 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
48

नागरिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन

पिंपरी, दि. २१ मार्च २०२६ – भोसरी परिसरातील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क या मार्गावरील रस्त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या कालावधीत वाहतुकीस कमीत कमी अडथळा निर्माण होईल यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व विभागांनी जबाबदारीने आपली कामे पार पाडावीत, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज भोसरी येथील प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत कामाचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणी दरम्यान त्यांचे समवेत नगरसदस्या भिमाबाई फुगे, प्रा. सोनाली गव्हाणे तसेच नगरसदस्य सागर गवळी, जालिंदर शिंदे, विराज लांडे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तसेच पाणीपुरवठा, स्थापत्य, शहरी दळणवळण, ड्रेनेज, जलनिस्सारण, नगररचना आदी विभागांचे कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महापौर यांनी पोलीस प्रशासनास रहदारी कमी करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थापत्य विभागास रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देताना कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला. शहरी दळणवळण विभागास वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज व जलनिस्सारण विभागांना रस्त्याच्या कामासोबतच संबंधित पायाभूत सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात रस्ता पुन्हा उकरावा लागू नये यासाठी सर्व कामे समन्वयाने पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. नगररचना विभागास नियोजनबद्ध विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य विभागास कामाच्या परिसरात स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन सुरळीत ठेवणे तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा ठेवावा, जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान महापौरांनी प्रभागातील नगरसदस्य व नगरसदस्या यांच्याशीही संवाद साधत स्थानिक समस्या व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

भोसरी परिसरातील प्रभाग क्र. ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. याबाबत स्थानिक नागरिक तसेच नगरसदस्यांकडून हा रस्ता तात्पुरता बंद ठेवावा आणि पर्यायी स्वरूपात एकेरी वाहतूक सुरू ठेवावी, अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्रीराम नवमीपर्यंत सदर रस्ता पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. श्रीराम नवमीनंतर कामाच्या प्रगतीनुसार हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि कामही सुरळीत पार पडेल. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. ही उपाययोजना तात्पुरती असली तरी ती नागरिकांच्या सोयी, सुरक्षितता आणि वाहतुकीच्या शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन
next post
पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका

You may also like

कोकणातील उष्णतेच्या लाटेने वाढविली चिंता, पुण्यातही वाढेल तापमान!

March 8, 2025

क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण;...

March 13, 2026

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम...

January 20, 2026

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक...

January 24, 2026

हफ्तेखोरी ते टेंडर रिंगपर्यंत आरोपांची मालिकाच; अजित पवारांचे...

January 3, 2026

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनावर महिला बचत गटांचा...

March 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग...

January 7, 2026

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस –...

March 7, 2025

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये...

February 25, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here