📍 जनसंपर्क कार्यालय, चिंचवड
भारतीय जनता पक्षाच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या जनसंपर्क कार्यालयात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच मतदारसंघातील सर्व नगरसेवक नगरसेविका, भाजपा पदाधिकारी आणि मंडलाध्यक्ष उपस्थित होते.
या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा केली. भारतीय जनता पक्षाच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले. तसेच सर्वांच्या एकजुटीने आणि नियोजनबद्ध प्रयत्नांतून विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

