• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार पिंपरी-चिंचवडच्या लघु उद्योजकांना दिलासा – प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा ‘विश्वास’!
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडच्या लघु उद्योजकांना दिलासा – प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा ‘विश्वास’!

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
516

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत सकारात्मक भूमिका
– आमदार महेश लांडगे आणि महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
कारखानदारी, लघुउद्योग ही पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख ओळख आहे. या उद्योग क्षेत्राचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. उद्योग, उद्योजक यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ‘‘ॲक्शन प्लॅन’’ बनवण्यात येईल. शहरातील लघु उद्योजकांवर अतिक्रमण कारवाई होणार नाही, असा विश्वास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर, महापालिका उपायुक्त मनोज लोणकर, क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, फ क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, प्रकाश गुप्ता, गोरख भोरे उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, कुदळवाडी-चिखली येथील अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासनासोबत बैठक झाली होती. त्यावेळी रस्ते आणि आरक्षणांमध्ये अडथळा ठरणारी, इंद्रायणी नदी प्रदूषण, वायू-ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आणि अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निश्चित केले होते. पण, प्रशासानाने सरसकट कारवाई केली. त्यामुळे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे. उद्योग, उद्योगक्षेत्र आणि उद्योजक यांच्या सर्व समावेशक विकासासाठी नेहमीच पाठीशी राहण्याची भूमिका भाजपा आणि आमची आहे. यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

.. अशा आहेत उद्योजकांच्या मागण्या!

1. चिखली कुदळवाडी येथील कारवाई झालेल्या उद्योजकांना तात्पुरत्या स्वरूपात मशीन, कच्चामाल तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी सोय करावी.
2. महापालिकेच्या डीपी प्लॅन नुसार आरक्षण असतील तर ते विकसित करण्यासाठी मराठा चेंबर सहकार्य करेल.
3. वर्षानुवर्ष लघु उद्योजकांचा पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात मोलाचा सहभाग आहे. त्यांना त्रास न होण्यासाठी उपाययोजना किंवा ॲक्शन प्लॅन तयार करावा.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकारी आणि आमची संयुक्त बैठक झाली. कुदळवाडीप्रमाणे सरसकट कारवाई करुन लघुउद्योजक व भूमिपुत्रांना नाहक त्रास होईल, अशी कारवाई प्रशासनाने करु नये, अशी ठाम भूमिका आम्ही प्रशासनासमोर मांडली. उद्योग क्षेत्रासाठी शहरात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे. नियम-अटी आणि विविध परवानग्यांसाठी महापालिका प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. शहरातील कोणत्याही उद्योगाला कुदळवाडीप्रमाणे त्रास होवू नये. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने 22 फेब्रुवारीला नवनिर्वाचित आमदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा
next post
“९,६७५ कोटींचा भव्य अर्थसंकल्प! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये काय आहे खास?”

You may also like

“‘आशादीप’ विझला; स्वरांचा सूर्य अनंतात विलीन — आमदार...

April 12, 2026

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार...

January 7, 2026

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

March 10, 2026

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला,...

February 24, 2025

विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, वॉर्ड क्रमांक...

January 7, 2026

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या...

December 23, 2025

‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक...

March 7, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा...

February 18, 2026

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड...

February 25, 2026

भूसंपादनासाठी निधी कमी पडू देणार नाही...

March 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here