• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले यांची मोठी मागणी!”
पिंपरी चिंचवड

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले यांची मोठी मागणी!”

by gauravsalunkhe00@gmail.com February 22, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
502

आठवले यांच्या हस्ते अजंठा नगर एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन

पिंपरी, पुणे (दि. २२ फेब्रुवारी २०२५) एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांना ३०० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती. आता कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे एसआरए अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२२) चिंचवड येथील अजंठा नगर एसआरए प्रकल्प टप्पा ३ चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, इलाबाई ठोसर, विश्वास गजरमल, अंकुश कानडी, आरपीआय महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हवळकर, युवक शहर अध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष योगेश भोसले, चिंचवड विभाग अध्यक्ष नितीन परेकर, राजेश बोबडे, सिकंदर सुर्यवंशी, विकास गाडे, मोहन म्हस्के, विकसक राजेश कदम आदी उपस्थित होते.

आठवले यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेतृत्व आहे. त्यांनी गरीब, शेतकरी, युवा यांच्यावर लक्ष केंद्रित करून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. ५० लाख ६५ हजार कोटींचा एकूण अर्थसंकल्प आहे. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागासाठी एक लाख ६८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

परभणी मध्ये झालेल्या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून दोन महिने झाले तरी चौकशी सुरू आहे. पोलिसांबद्दल आदर आहे, परंतु अशा घटनांची चौकशी होण्यासाठी एवढा वेळ लागणे योग्य नाही. या विषयात देखील मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे.

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्र सरकार अनुदान देते. तर दुसरीकडे आंतरजातीय विवाह केला म्हणून विक्रम गायकवाड सारख्या युवकाची हत्या होणे योग्य नाही. यातील आरोपी पकडले असून त्यांना फाशी व्हावी अशीही मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. भारतामध्ये वर्षाला साधारणपणे १८ लाख आंतरजातीय विवाह होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. जाती, धर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे. आरपीआयला लोकसभा आणि विधानसभेत महायुतीकडून जागा मिळाल्या नाहीत. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये तसेच जिल्हा नियोजन समिती आणि विविध राज्य महामंडळामध्ये आरपीआयला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. नागालँड, मणिपूरमध्ये आरपीआयचे आमदार आहेत. तसेच दादरा, नगर, हवेली, दिव, दमन, लक्षद्वीप सह सर्व राज्यात आरपीआय पोहचली आहे. महाविकास आघाडीचे अपयश म्हणजे ईव्हीएमचा दोष नसून महाविकास आघाडीचा दोष आहे. लाडक्या बहिणी आणि विशेषता दलित मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान केले. लाडक्या बहिणींना आता दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत. पात्र लाडक्या बहिणींना वेळेत पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्यामुळेच राज्यामध्ये महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. महायुती सक्षम असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा पुन्हा जाणे योग्य नव्हे. आरपीआय महायुतीत असताना राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फार फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला उपयोग होणार नाही असेही स्पष्टपणे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”
next post
“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम!”

You may also like

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी श्रीमती...

March 20, 2026

पिंपरी-चिंचवडच्या लघु उद्योजकांना दिलासा – प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा...

February 20, 2025

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा...

January 11, 2026

पिंपरी-चिंचवडला 54 पदांना मंजुरी: न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होणार...

December 9, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजपा सक्षम पॅनेल मैदानात; शत्रुघ्न काटे...

January 1, 2026

“पाणीटंचाईने त्रस्त पिंपरी-चिंचवड! आमदार शंकर जगतापांनी घेतली कडक...

May 3, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“घोटाळ्यांना Full Stop… आता विकासाला Fast...

June 14, 2025

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या...

December 20, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी...

February 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here