• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य “पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२ गुण!”
आरोग्यपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२ गुण!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 4, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
502

आरोग्य व्यवस्थापन, मातृ व बाल संगोपन आणि लसीकरणात आघाडी; ९२ गुणांसह ठरली राज्यातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका

पिंपरी दि. ४ मार्च २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली (HMIS) अहवालानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्येंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या विविध निकषांवर, विशेषतः कुटुंब कल्याण, मातृ व बाल संगोपन, तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने प्रसारित केलेल्या जानेवारी २०२५ च्या अहवालानुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवांमधील उत्तुंग कामगिरी

महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मातृ व बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यांपूर्वी प्रसूतीपूर्व नोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण आणि आयएफए (IFA) गोळ्यांचे वितरण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच बाल आरोग्य सेवांच्या अंतर्गत नवजात बालकांची नोंदणी प्रभावीपणे झाली आहे. नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचे नियोजन, तसेच पीपीआययूसीडी (Postpartum Intrauterine Contraceptive Device) बसवण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर, गरोदर महिलांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यावर भर देणे, या सारख्या विविध उपक्रमांचाही यामध्ये समावेश आहे.

राज्यातील आघाडीच्या महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड – ९२ गुण (प्रथम क्रमांक)

कोल्हापूर – ८८ गुण (द्वितीय क्रमांक)

सोलापूर – ८८ गुण (तृतीय क्रमांक)

नवी मुंबई – ८८ गुण (चतुर्थ क्रमांक)

सांगली – ८७ गुण (पाचवा क्रमांक)

पुणे – ८७ गुण (सहावा क्रमांक)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पुढील योजना

महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहेत. त्यामध्ये बर्न वॉर्ड, कॅन्सर हॉस्पिटल, आपला दवाखाना, डिजिटल हेल्थ सोल्यूशन्स, आरोग्य केंद्रे डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीशी जोडणे, स्मार्ट हेल्थ ट्रॅकिंग, नागरिकांच्या आरोग्य डेटाचे डिजिटल विश्लेषण, महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांचा विस्तार, झोपडपट्टी व दुरवरच्या भागात नवीन आरोग्य केंद्रे सुरू करणे, लसीकरण आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांना अधिक गती, लसीकरण कव्हरेज १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट, मातृ व बाल आरोग्यासाठी अतिरिक्त योजनांचा आराखडा अशा योजनांचा समावेश आहे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनास राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले आहे. भविष्यात अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवण्यावर, उपाययोजना करण्यावर भर देत आहोत.”

विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनात राज्यात अव्वल स्थान मिळवणे, ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी मोठी उपलब्धी आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा देण्यावर आमचा कायम भर राहील. भविष्यात डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, आधुनिक आरोग्य केंद्रे आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा आणखी बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

“सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनात राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणे, ही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सतत नव्या उपक्रमांची रचना आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यात आरोग्य सेवा आणखी सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा
  • ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी
  • शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे
  • नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे
  • निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर रवि लांडगे यांची भेट
  • नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख रुपयांचं विकास निधी, प्रभाग क्र. २० चे महत्त्वपूर्ण प्रकल्प आता होणार सुरू ~ योगेश बहल
next post
“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो महिलांचा उत्सव!”

You may also like

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील 50 वर्षांसाठी...

May 15, 2025

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत कामगिरी; पत्रकारांसाठी...

July 21, 2025

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू समाजाचा निषेध...

April 27, 2025

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये...

February 25, 2026

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark मागणी मुख्यमंत्री...

June 26, 2025

प्रभाग १० (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद; वर्षा...

December 31, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली...

December 20, 2025

आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!

December 19, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 805 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 760 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 750 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 718 views

Categories

  • आरोग्य (39)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (15)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (500)
  • पुणे (287)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (215)
  • मावळ (2)
  • राजकारण (155)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (39)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (15)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (500)
  • पुणे (287)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (215)
  • मावळ (2)
  • राजकारण (155)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर...

April 2, 2025

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 27, 2026

डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान

December 14, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here