• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेत दिग्गजांचा पक्षप्रवेश
पिंपरी चिंचवडराजकारण

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेत दिग्गजांचा पक्षप्रवेश

by gauravsalunkhe00@gmail.com December 24, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
62

पिंपरी | प्रतिनिधी
“आरंभ है प्रचंड” या घोषवाक्याला साजेसा राजकीय चित्रपट पिंपरी विधानसभेत पाहायला मिळत असून, आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा तसेच राज्याचे गतिमान मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेली ही राजकीय घडामोड केवळ पक्षप्रवेशापुरती मर्यादित नसून, भाजपच्या विकासाभिमुख विचारधारेवर वाढता जनविश्वास असल्याचे स्पष्ट संकेत देणारी ठरत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.

आज झालेला पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात पार पडला. या वेळी आमदार अमित गोरखे यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास आमदार महेश दादा लांडगे, शंकर भाऊ जगताप, उमाताई खापरे तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

🔶 शेट्टी व बाबर कुटुंबियांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
आजच्या पक्षप्रवेशात शहरातील हॉटेल व्यावसायिक क्षेत्रात तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेल्या शेट्टी कुटुंबियांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यासोबतच दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांनीही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला, ही या कार्यक्रमातील महत्त्वाची घडामोड ठरली.

यावेळी माजी नगरसेवक श्री. प्रकाश बाबर, माजी नगरसेविका सौ. शारदा बाबर, श्री. अमित प्रकाश बाबर आणि सौ. ऐश्वर्या बाबर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

तसेच माजी नगरसेवक श्री. उल्हास शेट्टी, श्री. प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका सौ. अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. देवीदास गोफणे, श्री. महेश गोफणे, महेश सहकारी बँकेचे श्री. अजय लढ्ढा, श्री. महेश काटे, श्री. संजय जगताप, श्री. लवकुश यादव, श्री. चेतन शेटे, श्री. गणेश कंकावणे आणि श्री. ऋषी शेट्टी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

राजकीय जाणकारांच्या मते, आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याने भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असून, आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम मतदारांवर दिसून येण्याची शक्यता आहे.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
  • २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
🔴 जनसंवाद दौऱ्यातून विश्वासाचा सेतू; विजयनगर-काळेवाडीत मच्छिंद्र तापकीर यांना नागरिकांचा पाठिंबा
next post
BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी होणार जाहीर

You may also like

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार विजेत्यांची...

February 25, 2025

आकुर्डीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ऍक्शन मोडवर; महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली...

January 27, 2026

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी

March 7, 2026

📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने...

April 19, 2026

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN तर्फे भव्य...

March 12, 2025

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक...

April 17, 2025

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

आज सकाळपासून GPay, PhonePe बंद! वापरकर्ते सोशल मीडियावर...

April 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका...

September 2, 2025

नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे...

February 13, 2026

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन...

April 13, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here